TCS, Google, Amazon, Intel lay off 2025: २०२५ या वर्षात जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपात झाल्याचे पाहयला मिळाले, आणि याचे एक महत्त्वाचे कारण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे राहिले आहे. ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि टीसीएस सारख्या मोठ्या कंपन्या असोत किंवा लहान कंपन्या, त्यांनी AI टूल्सचा वापर वाढवत त्यांच्या मनुष्यबळात मोठी कपात केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर्सनुसार, ग्लोबल टेक्नोलॉजी इंडस्ट्रीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात आली, ज्यामध्ये सुमारे २१८ टेक ब्रँड्समध्ये ११२००० हून अधिक लोकांना त्यांची नोकरी गमवावी लागली आहे,
सर्वाधिक नोकर कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये ॲमेझॉन, इंटेल आणि गूगल सारख्या प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या आघाडीवर आहेत. यापैकी बहुतेक कंपन्यांनी नोकरकपातीचे कारण हे, भांडवल आणि कौशल्य यांचे कोर AI डेव्हलपमेंट आणि क्लाउड कॉम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रांकडे रिअलॉकेशन हे असल्याचे सांगितले आहे.
२०२५ मध्ये कोणत्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक नोकर कपात?
१) इंटेल – चिप बनवणारी कंपनी इंटेलने सर्वात मोठ्या नोकरकपातीपैकी एक घोषित केली आहे. त्यांच्या जगभरातील कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची कंपनीची योजना आहे. ही संखया त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या संखेच्या अंदाजे २२ टक्के इतकी आहे. इंटेल सध्या एनव्हिडिया आणि एएमडी यांसारख्या प्रतिस्पर्धकांबरोरच्या स्पर्धेत मागे पडत आहे. तसेच पीसींच्या जागतीक मागणीमध्ये आलेली मंदी याचा देखील त्यांना फटका बसत आहे.
२) ॲमेझॉन – कंपनी जवळपास ३०००० कर्मचाऱ्यांची कपात करत आहे, ही कपात कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये केली जाईल. ज्यामध्ये क्लाउड (AWS), ऑपरेशन्स (Operations) आणि एचआर यांसारख्या विभागांचा समावेश आहे. कंपनीचे सीईओ अँडी जस्सी यांनी नोकर कपातीसाठी अति-विस्तार कमी करणे आणि एआय डेव्हलपमेंट ही दोन प्रमुख कारणे सांगितली आहेत.
३) टीसीएस – भारतातील सर्वात मोठी आयटी निर्यातदार असलेल्या टीसीएसमध्ये आजवरची सर्वात मोठी नोकर कपात केली जात आहे. यामध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने सुमारे २०,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. टीसीएसने या नोकर कपातीचे कारण एआय बूम, ऑटोमेशनवर आधारित पुनर्रचना आणि मिड लेव्हल आणि सिनियर लेव्हल कर्मचाऱ्यांकडे सध्या असलेली कौक्षल्य जुळून न येणे हे आहे.
४) मायक्रोसॉफ्ट आणि गूगल – २०२५ या वर्षामध्ये या दोन्ही कंपन्यांमध्ये नोकर कपातीच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मायक्रोसॉफटने जवळपास ९००० कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांहून काढून टाकले. कंपनीने या निर्णयाचे कारण हे खर्च कमी करणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर होणारा खर्च वाढवणे असल्याचे स्पष्ट केले. याच प्रकारे गुगलमध्येही अनेकांना घरी पाठवण्यात आले, ज्यामध्ये क्लाउड विभागातील १०० हून अधिक जणांचा समावेश आहे. आणि याचे कारण हे mature प्रॉडक्ट्सपासून संसाधने काढून ती AI संशोधन आणि विकासाकडे वळवण्याच्या कंपनीचे धोरण सांगितले जात आहे.
५) मेटा आणि सेल्सफोर्स- फेसबुकची मूळ कंपनी मेटा (Meta) आणि सेल्सफोर्स (Salesforce) या कंपन्यांनी देखील नोकर कपात केली आहे. मेटाने त्यांच्या एआय विभागातून ६०० जणांना काढून टाकले आहे. कार्यक्षमता सुधारण्यासाठी केलेल्या पुनर्रचनेचा भाग म्हणून ही कपात करण्यात आलेली आहे. तस सेल्सफोर्सने ४००० कस्टमर सपोर्ट नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे. सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी सांगितले की, एआयमध्ये असलेल्या कस्टमर इंटरॅक्शन ऑटोमेट करण्याच्या क्षमतेमुळे ही कपात करण्यात आली आहे.
