GST New Rate जीएसटी परिषदेची ५६ वी बैठक बुधवारी दिल्लीत सुरु झाली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटीचे आता फक्त दोन स्लॅब असतील. ५ टक्के जीएसटी आणि १८ टक्के जीएसटी. १२ आणि २८ टक्के जीएसटीचा स्लॅब सरकारने संपुष्टात आणला आहे. २२ सप्टेंबरपासून नेमकं काय स्वस्त होणार आपण जाणून घेऊ.

अन्न आणि अन्न पदार्थ

१) दूध आणि दुधाचे पदार्थ हे स्वस्त होतील. तर कंडेन्स्ड मिल्क, तूप, पनीर, चीज यावर १२ ऐवजी ५ टक्के जीएसटी लागणार आहे.

२) धान्यं, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, बिस्किटं, काही चॉकलेट्स, कोको उत्पादनं यांवरचा जीएसटी ५ टक्के असेल त्यामुळे ही उत्पादनंही स्वस्त होतील.

३) सुकामेवा म्हणजेच काजू, खजूर, पिस्ते यांवरचा जीएसटी ५ टक्के होईल त्यामुळे सुका मेवाही स्वस्त होईल

४) रिफाईंड साखर, साखरेचे सिरप, टॉफी, कँड यांच्यावरही आता ५ टक्के सुधारित जीएसटी असेल.

५) तेल, खाण्यायोग्य स्प्रेड्स, सॉस, मटण, मासे असे पॅकबंद पदार्थ आता ५ टक्के जीएसटीच्या कक्षेत येतील त्यामुळे ते स्वस्त होतील. आधी यांवर १२ किंवा १८ टक्के जीएसटी होता.

६) मिनिरल वॉटर, साखर नसलेले, स्वाद नसेलेले द्रव पदार्थ हे १८ वरुन ५ टक्के जीएसटीच्या कक्षेत

शेती उत्पादने कुठली स्वस्त होतील?

१) शेतीसाठी लागणारी खतं स्वस्त होतील कारण त्यांवरचा जीएसटी हा १८ आणि १२ टक्क्यांवरुन ५ टक्के इतका करण्यात आला आहे.

२) बियाणं, शेतीसाठी लागणारी साधनं यांवरचा जीएसटीही १२ टक्के नसून आता ५ टक्के असेल.

आरोग्य आणि शैक्षणिक विभाग

१) जीवनावश्यक औषधं, आरोग्यविषयक उत्पादनं आणि काही मेडिकल डिव्हाईस यांच्यावरचा जीएसटी १२ आणि १८ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे.

२) शैक्षणिक क्षेत्रातील पुस्तकांवरचा जीएसटी हा १२ वरुन ५ टक्के आणि काही उत्पादनांमध्ये ५ वरून शून्य टक्के करण्यात आला आहे.

ग्राहकोपयोगी वस्तूंवरचा टॅक्स कमी

१) इलेक्ट्रॉनिक्स एंट्री लेव्हल अॅप्लिकेशन्स यांच्यावरचा कर २८ वरुन १८ टक्के करण्यात आला आहे.

२) फूटवेअरवरचा जीएसटी १२ वरुन ५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे चपला, जोडे स्वस्त होतील.

३) डोक्याला लावायचं तेल, शॅम्पू, डेन्टल फ्लॉस, टुथपेस्ट या वस्तूंवरचा जीएसटी १८ वरुन ५ टक्के करण्यात आला आहे.

ऑटो सेक्टर

१) छोट्या कार्सवरचा जीएसटी २८ वरुन १८ टक्के करण्यात आला आहे.

२) ३५० सीसीपर्यंतच्या बाईक्सवरचा टॅक्स २८ वरुन १८ टक्के करण्यात आला आहे.

३) उंची कार, उंची मोटरसायकल यांच्यावर मात्र ४० टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे.

४) कारच्या ऑटो पार्ट्सवरचा जीएसटी १८ टक्के करण्यात आला आहे.

५) इलेक्ट्रीक व्हेईकल्सवरचा जीएसटी ५ टक्के करण्यात आला आहे.