Indias Top Per Capita Income States: चालू आर्थिक वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न १,१४,७१० रुपये झाले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत यासंबंधी माहिती दिली. २०१४-१५ मध्ये स्थिर किमतींवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (एनएनआय) ७२,८०५ रुपये होते. गेल्या दशकात ४१,९०५ रुपयांनी वाढ झाली आहे. राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आपल्या उत्तरात म्हटले की, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) ने जाहीर केलेल्या GDP च्या तात्पुरत्या अंदाजानुसार, २०२४-२५ साठी स्थिर किमतींवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (NNI) १,१४,७१० रुपये आहे. दहा वर्षांपूर्वी हेच प्रमाण ७२,८०५ रुपये एवढे होते.

‘सबका साथ, सबका विकास’मुळे शक्य

भारताच्या अनेक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण अवलंबले असून यामाध्यमातून सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. गरीबी कमी करण्यासाठी आणि समाजातील आर्थिक असमानता घालविण्यासाठी सरकारने विविध योजना आखल्या असल्याचीही माहिती त्यांनी दिली. या माध्यमातून देशभरातील वंचित घटकांना चांगल्या दर्जाचे जीवनमान प्रदान करण्यात सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य कोणते?

संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटकचा प्रथम क्रमांक लागतो. कर्नाटकचे दरडोई उत्पन्न २,०४,६०५ रुपये इतके आहे. त्याखालोखाल तमिळनाडू १,९६,३०९ रुपये, हरियाणा १,९४,२८५ रुपये, तेलंगणा १,८७,९१२ रुपये आणि पाचव्या क्रमांकावर १,७६,६७८ रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

अनुक्रमांकराज्य/केंद्रशासित प्रदेश2013-14 (₹मध्ये)2014-15 (₹मध्ये)2023-24 (₹मध्ये)2024-25 (₹मध्ये)
1कर्नाटक101858105697191970204605
2तमिळनाडू102191107117179732196309
3हरियाणा119791125032182816194285
4तेलंगणा96039101424177000187912
5महाराष्ट्र109597115058166013176678
6हिमाचल प्रदेश98816105241154330163465
7उत्तराखंड112900118979150931158819
8पुदुच्चेरी129127117102145921155533
9आंध्र प्रदेश7225479174131083141609
10पंजाब9323895807129561135356
11ओडिशा542095436199396106918
12राजस्थान61053644969041496638
13छत्तीसगड61409611228768193161
14पश्चिम बंगाल53811545207793382781
15जम्मू आणि काश्मीर (UT)*54783516497665381774
16आसाम43002448097593881127
17मेघालय59729574787448977412
18मध्य प्रदेश42548440276730170434
19अरुणाचल प्रदेश7900491034111107NA
20बिहार227762322332227NA
21गोवा188358241081357611NA
22गुजरात102589111370195617NA
23झारखंड437794878165062NA
24केरळ107846112444162040NA
25मणिपूर414414410165471NA
26मिझोराम6759485056152363NA
27नागालँड586196037281158NA
28सिक्कीम168897180675292339NA
29त्रिपुरा546456399297250NA
30उत्तर प्रदेश340443458350341NA
31अंदमान आणि निकोबार बेटे98735106711177335NA
32चंदीगड180615182867256912NA
33दिल्ली200702213669271490NA
34लडाख

महाराष्ट्राची पिछेहाट

२०१३-१४ साली महाराष्ट्र सर्वाधिक दरडोई उत्पन्नाच्या यादीत हरियाणा नंतर दुसऱ्या स्थानावर होता. त्यावेळी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १,०९,५९७ इतके होते. तर दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन दरडोई उत्पन्न १,१५,०५८ रुपयांवर पोहोचले होते. २०१४-१५ साली कर्नाटकचे दरडोई उत्पन्न १,०५,६९७ रुपये, तमिळनाडूचे १,०७,११७ रुपये आणि तेलंगणाचे १,०१,४२४ रुपये इतके उत्पन्न होते. महाराष्ट्राच्या मागे असलेली ही तीनही राज्य आता पुढे गेली आहेत. महाराष्ट्राची मात्र म्हणावी तशी आर्थिक प्रगती आकडेवारीनुसार तरी झालेली दिसत नाही.