SEBI Cancels Registration Of Four Stock Brokers : शेअर बाजार नियामक सेबीने नुकतीच चार स्टॉक ब्रोकर्सची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहे. नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आलेल्या स्टॉक ब्रोकर्समध्ये सिंगल विंडो सिक्युरिटीज, सननेस कॅपिटल इंडिया, जीएसीएम टेक्नॉलॉजीज आणि इन्फोटेक पोर्टफोलिओची यांचा समावेश आहे. या ब्रोकर्सनी नोंदणी प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेची पूर्तता न केल्यामुळे सेबीने हे पाऊल उचलले आहे. २९ जानेवारी रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर, सेबीने ही कारवाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेबीकडून चार वेगवेगळे आदेश

सेबीने चार वेगवेगळे आदेश जारी करत या ब्रोकर्सना त्यांची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली असल्याची माहिती दिली. या ब्रोकर्सची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे मुख्य कारण म्हणजे, या ब्रोकर्सना मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजचे सदस्य न होता त्यांच्या सेबी नोंदणी प्रमाणपत्राचा ​​गैरवापर करण्यापासून आणि अज्ञात गुंतवणूकदारांना गुतवणूक करण्यापासून रोखणे हे आहे.

याचबरोबर, सेबीने असेही म्हटले आहे की, “नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्यानंतरही, या कंपन्या स्टॉक ब्रोकर म्हणून केलेल्या कोणत्याही कृती किंवा चुकांसाठी जबाबदार असतील. तसेच, त्यांच्यावर सेबीची थकबाकी आणि व्याज चुकते करण्याची जबाबदारीही असेल.

का रद्द करण्यात आली नोंदणी प्रमाणपत्रे?

सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या ४ कंपन्यांना काही अटींच्या आधारे नोंदणी प्रमाणपत्रे देण्यात आली होती, त्यापैकी एक म्हणजे त्यांना कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजचे सदस्य व्हावे लागणार होते. पण त्यांनी सेबीच्या अटींची पूर्तता केली नाही. याचबरोबर या कंपन्यांनी ब्रोकर रेग्युलेशन १९९२ अंतर्गत स्टॉक ब्रोकर नोंदणीच्या आवश्यकताही पूर्ण केल्या नाहीत. या कारणास्तव, या ४ कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेवटी, सेबीने असेही म्हटले आहे की या चार कंपन्यांना स्टॉक एक्सचेंजने सदस्य म्हणून काढून टाकण्यात आले असून, त्यांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

नियमांचे पालक करून सेबीकडून कारवाई

दरम्यान मध्यस्थ नियमावली, २००८ मध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून, सेबीने या स्टॉक ब्रोकर्सची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi cancels stock brokers registration violations regulatory action stock market india news aam