लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : सार्वभौम सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा चालू वर्षांतील (२०२२-२३) तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला असून गुंतवणूकदारांना शुक्रवार, २२ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.या टप्प्यात सुवर्ण रोख्यांची खरेदी करताना गुंतवणूकदारांना प्रत्येक ग्रॅममागे ६,१९९ रुपये इतकी सोन्याची किंमत मोजावी लागेल, असे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार स्पष्ट केले आहे. जे गुंतवणूकदार ‘डिजिटल’ माध्यमातून ही खरेदी रक्कम भरतील, त्यांना रोख्याच्या खरेदीवर प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. म्हणजेच त्यांना ६,१४९ रुपये प्रति ग्रॅम या दराने सुवर्ण रोखे मिळविता येतील.
सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेकडून ही रोखे विक्री व्यवस्थापित केली जाते. सामान्य ग्राहकांना यासाठी निर्धारित बँकांच्या इंटरनेट बँकिंग अथवा प्रत्यक्ष शाखेतून आणि टपाल कार्यालयातून हे रोखे खरेदी करता येईल.
हेही वाचा >>>वित्तरंजन: स्वयंसेवी संस्थांसाठी ‘सोशल स्टॉक एक्स्चेंज’
सार्वभौम सुवर्ण रोखे विक्रीचा तिसरा टप्पा
विक्रीस प्रांरभ तारीख : १८ डिसेंबर २०२३
विक्री बंद होण्याची तारीख : २२ डिसेंबर २०२३
किंमत : प्रति ग्रॅम ६,१९९ रुपये