गेल्या काही दिवसांपूर्वीच आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवले आहेत. त्यामुळे आता बँकांमध्येही व्याजदर वाढवायचे की आधी आहे तेच कायम ठेवायचे यावरून चढाओढ पाहायला मिळतेय. आता एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) सारख्या बँकांच्या एफडी दरांची तुलना केली जात आहे, ज्याच्या आधारावर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटसाठी कोणती बँक निवडावी हे समजू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

SBI FD वरील व्याजदर काय?

स्टेट बँक ऑफ इंडिया ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देते. याशिवाय बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक व्याजदरही देत ​​आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठी वार्षिक ३ टक्क्यांवरून ७.१० टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत. जर तुम्ही बँकेत एक किंवा दोन वर्षांसाठी FD करत असाल तर सर्वसामान्य नागरिकांना ६.८ टक्के व्याज मिळत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी ७ टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय सामान्य नागरिकांना २ ते ३ वर्षांच्या एफडीवर ७ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.५ टक्के व्याज मिळत आहे. अमृत ​​कलश ही SBI द्वारे ऑफर केलेली एकमेव विशेष FD योजना आहे. यावर सर्वसामान्य नागरिकांना ७.१० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६० टक्के व्याज दिले जाते.

HDFC बँकेचे FD व्याजदर

HDFC बँक १ वर्ष ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ६.६० टक्के आणि १५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ७.१० टक्के व्याजदर देत आहे. बँक १८ महिने ते ५ वर्षांच्या कार्यकाळावर ७ टक्के व्याज देते. या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना अधिक आकर्षक व्याजदर मिळत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ५ ते १० वर्षांच्या FD वर तब्बल ७.७५ टक्के व्याजदर मिळत आहे.

ICICI बँक FD व्याजदर

ICICI बँक १ वर्ष ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ६.७० टक्के आणि १५ महिने ते २ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ७.१० टक्के व्याजदर देत आहे. बँक २ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ७ टक्के व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे दर वेगळे आहेत.

हेही वाचाः Tech Layoffs : अमेरिकेतील अनेक कंपन्यांमध्ये नोकर कपात; आता डेलॉइटने १,२०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

पीएनबी मुदत ठेव व्याजदर काय?

पंजाब नॅशनल बँक त्यांच्या वेगवेगळ्या मुदतीच्या FD वर ३.५ टक्के ते ७.२५ टक्क्यांपर्यंत वेगवेगळे व्याजदर देत आहे. तुम्ही एक आठवडा, दोन आठवडे FD केल्यास तुम्हाला ३.५ टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी बँक तुम्हाला ६६६ दिवसांच्या FD वर ७.२५ टक्के व्याजदर देत आहे.

हेही वाचाः IPO Update : ‘या’ आठवड्यात अनेक संधी उपलब्ध होणार, गुंतवणुकीसाठी तयार राहा, २ IPO बाजारात येणार

कॅनरा बँकेचे नवे एफडी दर

बँक आता २ कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ मुदत ठेवींवर किमान ४ टक्के आणि कमाल ७.२५ टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी किमान व्याजदर ४ टक्के आणि कमाल दर ७.७५ टक्के आहे. बँकेने बल्क डिपॉझिट्स म्हणजेच २ कोटींहून अधिकच्या एफडीवरील व्याजदरातही बदल केला आहे. २ कोटींपेक्षा कमी मुदत ठेवींबद्दल बोलायचे झाल्यास ७-४५ दिवसांसाठी ४ टक्के, ४६-९० दिवसांसाठी ५.२५ टक्के, ९१-१७९ दिवसांसाठी ५.५० टक्के, १८०-२६९ दिवसांसाठी ६.२५ टक्के व्याजदर आहे. २७० दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ६.५० टक्के, १ वर्षासाठी ७ टक्के व्याजदर मिळत आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest fd rates 2023 sbi hdfc icici pnb canara which bank interest rates are beneficial all information in one click vrd