एअर इंडिया लिमिटेडने सहाय्यक व्यवस्थापक आणि स्टेशन व्यवस्थापक यासह अनेक पदांसाठी भरती जारी केली आहेत. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या रिक्त जागांद्वारे एकूण ३० पदांची भरती केली जाईल. यामध्ये  अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट- airindia.in वर जावे लागेल.एअर इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या या रिक्त जागेत अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १७ ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. अशा स्थितीत या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या रिक्त पदासाठी अर्ज केला नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा. अर्जाची शेवटची तारीख निघून गेल्यानंतर अर्जाची लिंक वेबसाइटवरून काढून टाकली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पदांवर भरती होईल

बीपीओ टीम लीडर – १ पद

व्यवस्थापक (Trade Sales) – १ पद

अधिकारी/ AM विक्री (Sales Support & Market Analyst) – १ पद

अधिकारी/ AM (ग्राहक तक्रार) – १ पद

सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक / व्यवस्थापक – ५ पदे

स्टेशन मॅनेजर (उर्वरित भारत) – १४ पदे

AGM (IOCC) – १ पद

आयटी हेड – १ पद

एजीएम (वैद्यकीय सेवा) – १ पद

वरिष्ठ पर्यवेक्षक (वैद्यकीय) – १ पद

ग्राउंड इंस्ट्रक्टर (तांत्रिक/कामगिरी) – ३ पदे

पात्रता

या रिक्त जागेत बीपीओ टीम लीडर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. यासह, उमेदवाराला दोन वर्षे कॉल सेंटरमध्ये काम करण्याचा अनुभव असावा. त्याचबरोबर आयटी प्रमुख पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बी.ए. किंवा कॉम्प्युटर सायन्स मध्ये एमसीए पदवी. एजीएम (वैद्यकीय सेवा) पदासाठी, उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे.

याप्रमाणे अर्ज करा

या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करा. अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला अधिकृत संकेतस्थळावरील अधिसूचनेसह दिलेला अर्ज डाउनलोड करावा आणि तो अलायन्स एअर, कार्मिक विभाग, अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल -1, आयजीआय विमानतळ, नवी दिल्ली-110037 वर पाठवावा. स्पीड पोस्ट आवश्यक असेल.

निवड प्रक्रिया

मुलाखत प्रक्रियेद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेला उमेदवार @airindia.in/careers.htm इथे भेट देऊ शकतात.

 

 

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india recruitment 2021 ail job alert vacancy for assistant manager direct link to apply here airindia in careers htm ttg