गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, गांधीनगर येथे उपलब्ध असणाऱ्या फॉरेन्सिक सायन्सेस विषयांतर्गत विशेष अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभ्यासक्रमाचा तपशील आणि कालावधी २ वर्षे कालावधीचा एमएससी फॉरेन्सिक ऑडोंटोलॉजीचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम

जागांची संख्या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ३५.

आवश्यक शैक्षणिक पात्रता अर्जदारांनी डेंटल सर्जरी विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

अभ्यासक्रमाचा तपशील कालावधी१ वर्ष कालावधीचा फॉरेन्सिक नर्सिग विषयातील पदविका अभ्यासक्रम.

जागांची संख्या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या १५.

आवश्यक शैक्षणिक पात्रता अर्जदारांनी नर्सिग विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांची नर्सिग काऊंसिल ऑफ इंडियामध्ये नोंदणी झालेली असावी.

विशेष सूचना- राखीव वर्गगटातील अर्जदारांसाठी गुणांची टक्केवारी ५०% पर्यंत शिथिलक्षम आहे.

अधिक माहिती व तपशील- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या दूरध्वनी क्र. ०७९- २३९७७१७१ अथवा २३९७७१४४ वर संपर्क साधावा अथवा युनिव्हर्सिटीच्या www.gfsu.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत शेवटची तारीख विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज रजिस्ट्रार, गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी, सेक्टर ९, गांधीनगर (गुजरात) ३८२००७ या पत्त्यावर २१ नोव्हेंबर २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.