ग्रीन गॅस लिमिटेडमध्ये ऑफिसर (प्रोजेक्ट्स, ऑपरेशन्स अॅण्ड मेंटेनन्स) च्या ६ जागा–
उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल वा इन्स्ट्रमेंटेशनमधील इंजिनीअरिंग पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी गेट- २०१६ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ग्रीन गॅसच्या ६६६.ॠॠ’ल्ल’्रल्ली. ल्ली३ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१७.
मद्रास इंजिनीअरिंग ग्रुप अॅण्ड सेंटर, बंगलोर येथे स्टोअरकीपरच्या २ जागा–
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांना स्टोअरकीपिंगच्या कामाचा १ वर्षांचा अनुभव असायला हवा. संगणकाचे ज्ञान आवश्यक. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७ ते १३ जानेवारी २०१७ च्या अंकातील जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज सिव्हिलियन एस्टॅब्लिशमेंट ऑफिसर, एचक्यू, एमईजी अॅण्ड सेंटर, सिवान चेट्टी गार्डन पोस्ट, बंगलोर- ५६००४२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१७.
कोल इंडिया लि.मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून संधी–
अर्जदारांनी इंजिनीअरिंग, संगणकशास्त्र, पर्यावरण विज्ञान, कायदा, ह्य़ुमन रिसोर्स यांसारख्या विषयातील पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४ ते २० जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली कोल इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कोल इंडियाच्या www.bcplonline.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१७.
इंडियन ऑइलमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्सच्या संधी–
उमेदवारांनी अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी जीएटीई- २०१७ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन ऑइलच्या www.iocl.com अथवा http://www.iitr.ac.in/gate या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०१७.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र स्तरीय दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क परीक्षा– २०१७ अंतर्गत ३०० जागा–
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दूरध्वनी क्र. ०२२- २२६७०२१० अथवा २२७९५९०० वर संपर्क साधावा अथवा आयोगाच्या https://mahampsc.ahaonline.gov.in किंवा www.mpsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१७.
डिफेन्स बायो– इंजिनीअरिंग अॅण्ड इलेक्ट्रोमेडिकल लेबॉरेटरी, बंगलोर येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या २ जागा–
उमदेवारांनी इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी नेट/ गेट यांसारखी पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४ ते २० जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील तपशीलवार भरलेले अर्ज साध्या टपालाने डायरेक्टर, डिफेन्स बायो- इंजिनीअरिंग अॅण्ड इलेक्ट्रोमेडिकल लेबॉरेटरी, पोस्ट बॉक्स नं. ९३२६, सी. व्ही रमण नगर, बंगलोर ५६० ०८३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१७.
भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुरक्षा रक्षकांच्या १५ जागा–
उमदेवार बारावी उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांना संरक्षण दलातील कामाचा १५ वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या www.belindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०१७.