राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात जेथे पारंपरिक पद्धतीने विजेचा वापर करणे खर्चिक आहे किंवा भारनियमनामुळे विजेचा पुरवठा खंडित स्वरूपात उपलब्ध होतो अशा विविध ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या सामुदायिक अभ्यासिका, समाज मंदिर, ग्रामपंचायती कार्यालये, ग्राममंदिर, शाळा या ठिकाणी रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने सौर घरगुती दीप योजना अनुदानावर राबविण्यात येत आहे.

आर्थिक साहाय्य

  • यासाठी तांत्रिक व कमाल चाळीस हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते.
  • नगरपालिका, महानगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अखत्यारितीत पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांमध्ये ऊर्जाबचतीसाठी संयंत्रे बसविण्याची योजना असून त्यासाठीही अर्थसाहाय्य दिले जाते.
  • पथदिव्यांमध्ये ऊर्जाबचत संयंत्रे आस्थापित करण्यासाठी कमाल वीस लक्ष रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी पाच लक्ष रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य संबंधित यंत्रणांना दिले जाते.
  • महाऊर्जातर्फे ऊर्जा वाचविणारी आणखी एक योजना म्हणजे शासकीय इमारतीमध्ये ऊर्जा संवर्धन तंत्रज्ञान पथदर्शी प्रकल्प होय. याअंतर्गत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या इमारतीमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी एका वित्तीय वर्षांत २५ लाख रुपये अर्थसाहाय्य मंजूर केले जाते.
  • विविध कारणांसाठी भरमसाट विजेचा उपयोग करण्यापेक्षा अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढविणे आणि विजेचा काटकसरीने वापर करणे हे तंतोतंत पाळल्यास ऊर्जा समस्या भेडसावणार नाही.
  • सौर उष्णजल संयंत्र, सौर कंदील, सौर घरगुती दिवे, सौरपथदीप, सौरपंप, पवन-सौर संकरित सयंत्र, बायोगॅस संयंत्र अशी साधने वापरून उर्जा संवर्धन करता येईल. ऊर्जा बचत करता येईल.

अधिक माहितीसाठी : www.mahaurja.com