एनएमडीसीमध्ये मेंटेनन्स असिस्टंटच्या १२५ जागा  
उमेदवारांनी मिलराइट फिटर, वेल्डर, पंप मेकॅनिक, प्लंबर, टर्नर, ऑटो इलेक्ट्रिशियन, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, मोटर मेकॅनिकसारख्या विषयातील पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली एनएमडीसीची जाहिरात पाहावी अथवा एनएमडीसीच्या http://www.nmdc.co.i या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट जनरल मॅनेजर (पर्सोनेल), एनएमडीसी लि., धोनीमलाई आयर्न ओर माइन, धोनीमलाई टाऊनशिप, जि. बेल्लारी ५८३११८ (कर्नाटक) या पत्त्यावर १० मार्च २०१५ पर्यंत पाठवावेत.

‘इस्रो’ -नेल्लोर येथे टेक्निकल असिस्टंटच्या १४ जागा
उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, केमिकल, ऑटोमोबाइल, मेकॅनिकल इंजिानीअिरग यांसारख्या विषयांतील पदविका प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’- नेल्लोरची जाहिरात पाहावी अथवा इस्रोच्या ttp://sdsc.shar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ मार्च २०१५ पर्यंत पाठवावेत.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात शिपायांसाठी ७०० जागा  
उमेदवारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या http://www.cisf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १४ मार्च २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

एनटीपीसीमध्ये आयटीआय प्रशिक्षार्थीच्या १५ जागा
उमेदवार शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्टुमेंटेशन यासारखी पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ४२ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली एनटीपीसीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज हेड ऑफ दि ह्य़ुमन रिसोर्सेस डिपार्टमेंट, कहलगाव सुपर थर्मल पॉवर स्टेशन, दीप्तीनगर, पो. कहलगाव (जि. भागलपूर) ५१३२१४ बिहार या पत्त्यावर १५ मार्च २०१५ पर्यंत पाठवावेत.