भारतीय नौदलात नोकरी शोधणार्‍या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलाने कार्यकारी, तांत्रिक आणि शिक्षण शाखेसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) अधिकाऱ्यांसाठीची भरती होतं आहे. या पदांसाठी पात्र असलेले इच्छुक उमेदवारांनी २१ सप्टेंबरपासून joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईडवर जाऊन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२१ आहे. इंडियन नेव्ही एसएससी ऑफिसर कोर्स २२ जून २०२२ पासून इंडियन नेव्हल अकादमी (INA) एझीमाला, केरळ येथे सुरू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिक्त पदांचा तपशील

एक्झिक्युटीव्ह ब्रँच

जनरल सर्व्हिस [GS(X)] / हायड्रो कॅडर – ४५ पदे

एयर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) – ४ पदे

निरीक्षक – ८ पदे

पायलट – १५ पदे

लॉजिस्टिक – १८ पदे

शिक्षण शाखा

शिक्षण – १८ पदे

तांत्रिक शाखा

अभियांत्रिकी शाखा (सामान्य सेवा) – २७ पदे

इलेक्ट्रिकल शाखा (सामान्य सेवा) – ३४ पदे

नेव्हल आर्किटेक्ट (NA) – १२ पदे

इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पात्रतेसाठीची दिलेली अधिकची माहिती जाणून घेऊ शकतात.

निवड प्रक्रिया

प्राप्त अर्जांच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पात्रता पदवीच्या ५ व्या सेमिस्टरपर्यंतच्या गुणांचा विचार केला जाईल. तसेच शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एसएसबी मुलाखतीची माहिती एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy recruitment 2021 apply for indian navy recruitment from 21st september scsm