इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने आपल्या भविष्यातील वाढीला चालना देण्यासाठी भारतभर अनेक रिक्त पदांची घोषणा केली आहे आणि भारतीय राष्ट्रीयत्वाच्या ‘उज्ज्वल, तरुण आणि उत्साही’ व्यक्तींकडून विविध पदांवर निवडीसाठी अर्ज मागवले आहेत. वेतनश्रेणी २५,००० ते १,०५,००० रुपयांच्या दरम्यान असेल आणि IOCL च्या रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिट्ससाठी गुवाहाटी, डिगबोई, बोंगाईगाव (आसाम), बरौनी (बिहार), वडोदरा (गुजरात), हल्दिया (पश्चिम बंगाल) , मथुरा (उत्तर प्रदेश), पानिपत (हरियाणा) आणि पारादीप (ओडिशा)येथे रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.
इंडियन ऑईल (IOCL) भरती: वयोमर्यादा
३० सप्टेंबर २०२१ रोजी सामान्य उमेदवारांसाठी किमान १८ वर्षे आणि कमाल वय २६ वर्षे हवे. बाकीच्यांना सरकारी नियमांनुसार सूट दिली जाईल.
इंडियन ऑईल (IOCL) भरती: अर्ज कसा करावा?
१. http://www.iocl.com वर IOCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. ‘व्हॉटस न्यू’वर जा. (What’s New)
३. रिफायनरीज विभागात जा.
४. “तपशीलवार जाहिरात” वर क्लिक करा (जाहिरातीचा संदर्भ घेण्यासाठी)
५. “ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा” (ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी) वर क्लिक करा.
शेवटची तारीख
ऑनलाइन अर्जाची लिंक १२ ऑक्टोबर २०२१पर्यंत खुली राहील.
हे लक्षात घ्यावे की ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज फक्त स्वीकारले जातील. ऑनलाइन अर्ज यशस्वीरीत्या सादर केल्यानंतर, उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे देखील पाठवणे आवश्यक आहे-विधिवत स्वाक्षरी केलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रिंट आउट, सेल्फ-अटेस्टेशन अंतर्गत रंगीत छायाचित्र आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती, सामान्य प्राधिकरणाकडे २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोस्ट करा.उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.