यु एम सी अर्थात उल्हासनगर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे. तब्बल २७४ जागांसाठी भरती होणार आहे. ही भरती थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, हॉस्पिटल प्रशासन ही रिक्त पदे आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. लक्षात घ्या मुलाखतीची तारीख ४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२१ असणार आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
स्टाफ नर्स
वॉर्ड बॉय
वैद्यकीय अधिकारी
फार्मासिस्ट
लॅब टेक्निशियन
हॉस्पिटल प्रशासन
SBI Recruitment 2021: एकूण ६०६ पदांसाठी होणार भरती; अधिसूचना जारी
शैक्षणिक पात्रता काय हवी?
स्टाफ नर्स या पदासाठी GNM किंवा ANM मध्ये शिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे. वॉर्ड बॉय या पदासाठी दहावी उत्तीर्ण, स्किल इंडिया कामातून प्रशिक्षण आणि कोविड सेवेचा अनुभव आवश्यक.वैद्यकीय अधिकारी या पदासाठी संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक आहे.फार्मासिस्ट या पदासाठी फार्मसीमध्ये शिक्षण आणि कामाचा अनुभव आवश्यक आहे. लॅब टेक्निशियन या पदासाठी Bsc आणि संबंधित विषयांमध्ये पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक आहे. हॉस्पिटल प्रशासन या पदासाठी कोणत्याही मेडिकल शाखेतील पदवी, तसंच हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
Navy Recruitment 2021: भरतीची अधिसूचना जारी; १२ वी पास देखील करू शकतात अर्ज
पगार किती?
वैद्यकीय अधिकारी या पदासाठी १,५०,०० ते २,५०,०० रुपये प्रतिमहिना मिळेल. स्टाफ नर्स या पदासाठी ३५,००० ते ४५,००० रुपये प्रतिमहिना पगार मिळेल. वॉर्ड बॉय या पदासाठी २०,००० रुपये प्रतिमहिना पगार मिळेल. फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन या पदांसाठी 30,००० रुपये प्रतिमहिना पगार मिळेल. हॉस्पिटल प्रशासन या पदासाठी ५०,००० रुपये प्रतिमहिना पगार मिळेल.