प्रा. रवींद्र कुलकर्णी
सर्व विद्यार्थ्यांच्या आणि उपस्थित शिक्षकांच्या मनात अपार उत्सुकता दाटली होती. आज प्रा. रमेश सर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात मूल्यमापन व परीक्षा पद्धतीबद्दल सांगणार होते. सर सांगू लागले, ‘‘NEP अंतर्गत होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा आणि मूल्यमापन करण्याच्या आनंददायी पद्धती आहेत. पूर्वी परीक्षा म्हटलं की अनेकांच्या पोटात गोळा उमटत असे. पण आता मात्र परीक्षा देणं हा एक अध्ययनाच्या आनंदाला वाढवणारा, तुमच्या ज्ञानाची अधिक योग्य तपासणी करणारा भाग असेल, आपण सर्वात प्रथम सारांशात्मक परीक्षा आणि तिच्या धोरणांविषयी बोलू या-
१) सारांशात्मक (Summative) परीक्षा आणि त्या अंतर्गत अपेक्षित असलेली मूल्यमापन धोरणे (Strategies):
I. वर्ग चाचण्या: प्रत्येक सत्रात निदान दोन ते तीन वेळा वर्ग चाचण्यांचे आयोजन केले गेले पाहिजे. चाचणी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठीही एखादी पूर्वचाचणी आयोजित करावी. या वर्गचाचण्या अभ्यासाच्या सर्व घटकांना व स्तरांना कवेत घेणाऱ्या असाव्यात, त्यांच्या गुणांकनांचे निकष विद्यार्थ्यांना आधीच सांगावेत आणि संबंधित विषय शिक्षकांनी वर्गचाचणीच्या उत्तरांची वर्गात चर्चा करायला हवी.
II. खुली पुस्तक परीक्षा: तसं पाहिलं तर औपचारिक शिक्षणाच्या पलीकडे असलेल्या वास्तव जीवनात आपण नेहमी खुली पुस्तक परीक्षाच देत असतो. दैनंदिन जीवनातील कामाच्या वास्तव परिस्थितीला तोंड देण्यासाठी जर विद्यार्थ्यांना तयार करायचं असेल तर विद्यार्थ्यांना खुल्या पुस्तक परीक्षांचा आधार घेऊन तयार केले पाहिजे. या परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांना हव्या त्या पुस्तकांचे संदर्भ घेऊ शकतात. अशा खुल्या पुस्तक चाचणीमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे केवळ माहितीच्या पुनप्र्राप्तीवर आधारित नसून ते सर्जनशील असावेत याची दक्षता परीक्षकांनी घ्यायला हवी. खुली पुस्तक परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांची उत्तरे तयार करत असताना कोणत्या प्रकारच्या पुस्तकांचे संदर्भ मिळवतात व वापरतात, त्याची परीक्षा असते. ही चाचणी म्हणजे त्यांच्या स्मरणशक्तीची तपासणी नसते. या चाचण्यांपैकी एक चाचणी, म्हणजे साधारणपणे ३० टक्के परीक्षा ही वर्गपाठाची हवी (class assignment)असायला हवी. यामुळे विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाची समज त्यांना किती झाली आहे आणि त्याचा वापर ते कसा करतात, याचा अंदाज बांधता येईल.
III. मौखिक / तोंडी परीक्षा: नव्या जनरेशनच्या वा अद्यतन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अशा प्रकरच्या परीक्षा घेता येणं आता सोपं झालं आहे. या तंत्रज्ञानामुळे मौखिक/ तोंडी परीक्षा गतिमानतेने घेता येते आणि विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांचा त्यातून परिचय होतो.
IV. गटवार चर्चा व गटवार कार्ये/ फिश बाऊल तंत्र/ भूमिका स्वीकारणे/ समस्या निवारणाचा प्रमाणिक प्रयत्न: या प्रकारात विद्यार्थ्यांचे २ ते ५ जणांचे छोटे छोटे गट तयार करून समूह प्रयत्न करायला शिजवणे अभिप्रेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सांघिक कार्य आणि समूह प्रयत्न कसे करायचे याला प्रोत्साहन मिळेल; तसेच त्यांना प्रामाणिक कौशल्य विकासाची संधी यातून मिळेल. यासाठी तयार केलेले गट आकाराने अंदाजे समान असले पाहिजेत, त्यांच्या समोर मांडल्या गेलेल्या समस्या ह्य़ा एकसमान असाव्यात आणि त्यांची काठीण्य पातळी एकसमान असावी. त्याचबरोबर प्रत्येक सदस्याची निश्चित केलेली एखादी भूमिका असावी. त्यांच्या गुणांकनासाठी ठरवले गेलेले रुब्रिक्स हे सर्वानुमते ठरवले गेले पाहिजेत व त्यात शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांचा समावेश हवा.
प्रा. रमेश सर सांगत असलेला प्रत्येक शब्द विद्यार्थी आणि उपस्थित सहकारी प्राध्यापक कान देऊन ऐकत होते. सर्वाच्या मनावर ठएढ मधला हा भाग एक नवं गारुड घालत होता. सर पुढे सांगू लागले-
५. काही वेळा प्रकल्पांसाठी आणि प्रयोगशाळेतील मूल्यांकनांसाठीही अशा पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु सामान्यत: थिअरी प्रकाराच्या परीक्षांसाठी त्याचे पालन केले जात नाही. तथापि, थिअरी पेपर्ससाठी गट परीक्षांमुळे, एकूण वर्गाची सरासरी कामगिरी सुधारू शकते; कारण, विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान एकमेकांसोबत शेअर करण्यास प्रोत्साहित केले जाते आणि त्यांचे सामान्य ज्ञानही वृद्धिंगत होते.
vi. सत्रांत परीक्षा: ही पारंपरिक पद्धतीची परीक्षा असेल. या परीक्षेत दीघरेत्तरी, निबंधसदृश उत्तरांची अपेक्षा आहे. या परीक्षेला वेळेचंही बंधन असेल. आत्तापर्यंत घेतल्या गेलेल्या सत्रांत परीक्षा या उच्च स्तरावरील विचारांपेक्षा, अधिकतर स्मरणशक्तीचीच चाचणी करतात. परंतु NEP दरम्यानची सत्रांत प्रश्नपत्रिका ही संज्ञानात्मक डोमेनच्या सर्व स्तरांची चाचणी घेण्यासाठी तयार केलेली असेल अशी काळजी संबंधित विषयशिक्षकाने घ्यायला हवी. सदर परीक्षेत निबंध, लघुत्तरी प्रश्न, परिमाणात्मक समस्यांवर आधारित प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न अशा सर्व प्रकारांचा समावेश असावा. विद्यार्थ्यांसाठी दीघरेत्तरी, निबंध सदृश प्रश्नांची आदर्श उत्तरे तयार करून ती विद्यार्थ्यांना वितरित करायला हवीत, जेणेकरून मूल्यांकनातील व्यक्तिनिष्ठता दूर होऊन त्यांच्या गुणांना अधिक महत्त्व मिळेल. याबरोबरच विद्यार्थ्यांना गुणांकनाचे निकषही आधीच समजावून द्यायला हवेत, म्हणजे त्यांना आपली पूर्वतयारी नीट करता येईल.
NEP मुळे परीक्षा पद्धतीत येऊ घातलेले आमूलग्र बदल ऐकून विद्यार्थी उत्तेजित झाले आणि उपस्थित प्राध्यापकांना आपल्यासमोर कोणत्या प्रकारची आव्हाने येऊन उभी ठाकली आहेत याचा अंदाज आला.
रमेश सरांनी सर्वाना सांगितले, ‘‘पुढच्या वेळी आपण विकसनशील परीक्षापद्धत समजून घेऊ या.’’ सर्वानी परस्परांचा निरोप घेतला.
अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर