इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिडेटने डिलरच्या पदासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज मागवले आहे. या पदावर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तुम्ही पात्र उमेदवार असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. त्यासाठी तुम्ही इंडबँकच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फॉर्म बँकेच्या पत्त्यावर पाठवावा लागेल त्यामुळे वेळेची मर्यादा लक्षात घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथे करा अर्ज

इंडबँकच्या या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर (https://www.indbankonline.com/careers.aspx ) भेट द्या. येथून या पदांची सविस्तर माहितीही मिळू शकते. या भरती मोहिमेद्वारे, संस्थेमध्ये स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्ससाठी डीलरची एकूण १२ पदे भरली जातील.

अर्जासाठी पात्रता काय आहे

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने NISM/NCFF (NISM/NCFM) असलेल्या मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. या रिक्त पदांसाठी वय मर्यादा २१ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय उमेदवाराला व्यवहाराचा एक वर्षाचा अनुभव असावा.

Government Internships: केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात इंटर्नशिपची संधी! मिळेल ‘इतके’ मानधन

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेत मुलाखतीचा समावेश असतो. पात्र उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी एक स्क्रीनिंग समिती या पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करेल. मुलाखत आणि अंतिम निवड कंपनीच्या समितीद्वारे केली जाईल.

पगार

उमेदवाराची निवड झाल्यास त्याला ३.५ लाख रुपये इतका वार्षिक पगार मिळेल. तसेच कोलकत्ता, वाराणसी, कानपूर, भुवनेश्वर, जयपूर, चंदीगढ, इंदौर, सुरत, लखनऊ, पुणे, सिंकदराबाद, पंजाबी बाग या ठिकाणी रिक्त जागांवर भरती होणार आहे.

हेही वाचा : GAIL Recruitment 2023: ६०,००० रुपये महिना पगाराची नोकरी पाहिजे, मग त्वरित करा अर्ज, फक्त ही पदवी पाहिजे

अर्ज कसा करावा

या पदांसाठी अर्ज करण्‍यासाठी उमेदवारांना वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करावा लागेल आणि भरलेले अर्ज कुरिअर/नोंदणीकृत टपालाद्वारे हेड अॅडमिनिस्ट्रेशन, ४८०, पहिला मजला, खिवराज कॉम्प्लेक्स १, अण्णा सलाई, नंदनम चेन्नई- ६००००३५ येथे पाठवावे लागतील. अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार इंडबँकचे अधिकृत संकेतसथळ पाहू शकतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indbank recruitment 2023 for 12 dealer posts apply before 22 april snk