Indian Navy Recruitment 2025 Registration Process : भारतीय नौदलात काम करण्याची संधी तुम्ह्याकडे चालून आली आहे. भारतीय नौदलाने ५ जुलै २०२५ रोजी INCET २०२५ साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय नौदलाची नागरी प्रवेश परीक्षा २०२५ देऊ इच्छिणारे अर्जदार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वरून अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत संस्थेतील ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ८८२ पदे भरली जाणार आहेत. परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जुलै २०२५ अशी असणार आहे. तर या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता १० वी, १२ वी आणि पदवी आहे. कॅमेरामॅन, स्टाफ नर्स (Staff Nurse) ते अग्निशमन इंजिन चालक, अग्निशामक, स्टोअरकीपर आदी अनेक विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेमध्ये भरतीसाठी पात्रता आणि शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी.
निवड प्रक्रिया (Indian Navy Recruitment 2025 Selection Process)
सर्व पात्र अर्जदारांनी इंग्रजी आणि हिंदी दोन्हीमध्ये बहुपर्यायी प्रश्नांसह ऑनलाइन चाचणी द्यावी लागेल; जी संगणकावर आधारित असेल तसेच या चाचणीत तुम्हाला ९० मिनिटांत एकूण १०० प्रश्न विचारले जातील.
फी (Indian Navy Recruitment 2025 Application Fees)
इच्छुक उमेदवारांना (अनुसूचित जाती / जमाती / दिव्यांग / माजी सैनिक आणि महिला अर्जदार सोडून ) नेट बँकिंग किंवा व्हिसा / मास्टर / रुपे क्रेडिट / डेबिट कार्ड / यूपीआय द्वारे ऑनलाइन २९५ रुपये शुल्क भरावे लागेल.
परीक्षा पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता आहे? (ndian Navy Recruitment 2025 Minimum Qualifying Marks)
ऑनलाइन संगणकावर होणारी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी…
अनारक्षित (Unreserved) – ३५%
ओबीसी / ईडब्ल्यूएस – ३०%
इतर सर्व श्रेणी – २५ %
कागदपत्रांची पडताळणी कशी होणार? (Indian Navy Recruitment 2025 Document Verification)
वय, शिक्षण, ओळखपत्र, पत्ता, श्रेणी आणि जात वैधता प्रमाणपत्र यासह सर्व कागदपत्रांची तपासणी डीओपी अँड टी धोरणानुसार केली जाईल. संभाव्य निवडलेल्या अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल फोन, ई-मेल आयडी आणि पोस्टद्वारे कागदपत्र पडताळणीची तारीख आणि ठिकाणाची सूचना दिली जाईल.
भारतीय नौदलात भरती २०२५ साठी अर्ज कसा करावा? (How To Apply For Indian Navy Recruitment 2025)
- भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in ला भेट द्या.
- यानंतर, Join Navy > Ways to Join > Civilians > INCET-01/2025 वर क्लिक करा.
- आता, सर्व सूचना आणि पात्रता निकष वाचा.
- अर्ज फॉर्म भरा, पेमेंट करा आणि स्कॅन केलेल्या कागदपत्रांच्या प्रत अपलोड करा.
- अर्ज फॉर्म काळजीपूर्वक तपासल्यानंतर सबमिट करा.
- अर्ज फॉर्म डाउनलोड करा आणि संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.
अर्ज भरण्याची थेट लिंक
https://incet.cbt-exam.in/incetcycle3/login/user
तसेच पात्रता आणि निकष जाणून घेण्यासाठी, अर्जदारांनी अधिकृत जाहिरात तपासून घ्यावी…