सुहास पाटील

युनियन पब्लिक सव्‍‌र्हिस कमिशन (UPSC) केंद्र सरकारच्या विविध डिपार्टमेंटमध्ये पुढील पदांची सिलेक्शन पद्धतीने भरती करणार आहे.

(१) डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन, मिनिस्ट्री ऑफ सिव्हील एव्हिएशनमध्ये एअर सेफ्टी ऑफिसरग्रुप-ए (गॅझेटेड) – एकूण ४४ पदे (अजा – ७, अज – ३, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – १८) (४ पदे दिव्यांग (कॅटेगरी –  B/LV – १,  D/ HH – २,  MD – १) उमेदवारांसाठी राखीव.)

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – १० (रु. ५६,१००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. १.०५ लाख.

पात्रता : एअरोनॉटिकल इंजीनिअरींग पदवी.

वयोमर्यादा : ३५ वर्षे.

(२) एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO), मिनिस्ट्री ऑफ लेबर अ‍ॅण्ड एम्प्लॉयमेंटमध्ये ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरग्रुप-बी (नॉन-मिनिस्ट्रीयल) – एकूण ८६ पदे (अजा – १४, अज – ९, इमाव – २८, ईडब्ल्यूएस – १२, खुला – २३) (४ पदे दिव्यांग (कॅटेगरी – B/LV  – १, D/HH – १,  LD/CP – १, MI/ MD – १) उमेदवारांसाठी राखीव)

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ६ (रु. ३५,४००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ६४,०००/-.

पात्रता : ( i)  M. A. (हिंदी) (पदवी स्तरावर इंग्लिश विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम इंग्लिश असावे किंवा  M. A. (इंग्लिश) (पदवी स्तरावर हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम हिंदी असावे किंवा कोणत्याही विषयातील (हिंदी किंवा इंग्लिश वगळता) पदव्युत्तर पदवी इंग्लिश किंवा हिंदी माध्यमातून (पदवी स्तरावर माध्यम इंग्लिश असल्यास हिंदी विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवी स्तरावर माध्यम हिंदी असल्यास इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा.)

आणि (ii) हिंदीमधून इंग्लिश किंवा इंग्लिशमधून हिंदी ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स किंवा केंद्र/राज्य सरकारी कार्यालयात किंवा भारत सरकारच्या उपक्रमातील हिंदीमधून इंग्रजी किंवा इंग्रजीमधून हिंदी भाषांतर करण्याचा २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : ३० वर्षे.

(३) जीऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ माईन्समध्ये ‘असिस्टंट सव्‍‌र्हे ऑफिसर ग्रुप-बी गॅझेटेड एकूण – ७ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग (कॅटेगरी D/ HH, MD) उमेदवारांसाठी राखीव.)

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ७ (रु. ४४,९००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ८०,०००/-.

पात्रता : सिव्हील/ मायिनग इंजिनिअरींग पदवी किंवा अटकए.

अनुभव : इंजीनिअरींग किंवा सव्‍‌र्हेईंग इस्टॅब्लिशमेंटमधील सव्‍‌र्हेईंग कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा : ३० वर्षे.

(४) जीऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ माईन्समध्ये ‘असिस्टंट इंजिनिअर ग्रेड- क ग्रुप-बी गॅझेटेड’ एकूण – ३ पदे (इमाव – १, खुला – २).

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ८ (रु. ४७,६००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ८५,०००/-.

पात्रता : मायनिंग/ ड्रिलिंग/ मेकॅनिकल इंजिनिअरींग पदवी किंवा  AMIE.

वयोमर्यादा : ३० वर्षे.

(५) नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA), गृहमंत्रालयामध्ये पब्लिक प्रॉसिक्युटर ग्रुप-ए गॅझेटेड एकूण – २३ पदे (अजा – २, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी  B/ LV साठी राखीव).

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – १० (रु. ५६,१००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. १.०५ लाख.

पात्रता : कायदा विषयातील पदवी.

अनुभव : क्रिमिनल केसेसची ७ वर्षांची अ‍ॅडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस किंवा स्टेट ज्युडिशियल सव्‍‌र्हिसेस किंवा राज्य/केंद्र सरकारच्या लीगल डिपार्टमेंटमधील ७ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : ३५ वर्षे.

(६) डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅनिमल हजबंडरी अ‍ॅण्ड डेअरिईंग, मिनिस्ट्री ऑफ फिशरीज, अ‍ॅनिमल हजबंडरी अ‍ॅण्ड डेअरिईंगमध्ये लाईव्ह स्टॉक ऑफिसर्स ग्रुप-ए गॅझेटेड – एकूण ६ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – २, खुला – १) (१ पद दिव्यांग कॅटेगरी  ऊ/ ऌऌ साठी राखीव).

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – १० (रु. ५६,१००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. १.०५ लाख.

पात्रता : (i) वेटेरिनरी सायन्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल हजबंडरी पदवी B. V. Sc. &  AH), ( ii) वेटेरिनरी काऊन्सिल ऑफ इंडिया किंवा स्टेट वेटेरिनरी काऊन्सिलकडील रजिस्ट्रेशन.

अनुभव : कॅटल अ‍ॅण्ड लाईव्ह स्टॉक डेव्लपमेंट किंवा अ‍ॅनिमल हेल्थ किंवा पोल्ट्री किंवा मिट अ‍ॅण्ड मिट प्रोडक्ट्स संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

इष्ट पात्रता :  M.V.Sc. किंवा कॅडल आणि लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट किंवा अ‍ॅनिमल हेल्थ किंवा पोल्ट्री किंवा मिट अ‍ॅण्ड प्रोडक्ट्स संबंधित कामाचा अधिकचा २ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : ३५ वर्षे.

(७) डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन (मिनिस्ट्री ऑफ सिव्हील एव्हिएशन) मध्ये ‘एअर वर्थीनेस ऑफिसर ग्रुप-ए गॅझेटेड’ (( Air Worthiness Officer)) – एकूण ८० पदे (अजा – ६, अज – ३, इमाव – २४, ईडब्ल्यूएस – ११, खुला – ३६) (१ पद दिव्यांग कॅटेगरी  LD/ CP साठी राखीव).

वेतन श्रेणी : पे-लेव्हल – १० (रु. ५६,१००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. १.०५ लाख.

पात्रता : (i)  B.Sc (फिजिक्स किंवा मॅथेमॅटिक्स किंवा एअरक्राफ्ट मेंटेनन्स) किंवा  B.E./ B.Tech. (एअरोनॉटिकल किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलीकम्युनिकेशन), (ii) डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन यांनी जारी केलेले कॅटेगरी  इ-१ किंवा  इ-२ एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजीनिअरींग (AME) लायसन्स. (एअरोनॉटिकल इंजीनिअरींग पदवीधारक उमेदवारांना एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर्स (AME) लायसन्सची आवश्यकता नाही.)

अनुभव : ३ वर्षांचा एअरक्राफ्ट मेंटेनन्स कामाचा अनुभव.

वयोमर्यादा : ३५ वर्षे.

सर्व पदांसाठी पात्रता आणि वयोमर्यादा दि. १३ जुलै २०२३ रोजी धारण करणे आवश्यक.

सर्व पदांसाठी वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे.

निवड पद्धती : शॉर्ट लिस्टेड उमेदवारांमधून इंटरव्ह्यू घेऊन केली जाईल.

अर्जाचे शुल्क : रु. २५/- (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना फी माफ आहे.) ऑनलाइन रिक्रूटमेंट अ‍ॅप्लिकेशन  https:// http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. १३ जुलै २०२३ पर्यंत करावेत.