● रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती बोर्ड्स अंतर्गत पदवीधर उमेदवारांची नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ( NTPC) च्या एकूण ५,८१० पदांची २१ रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्समध्ये भरती.

(RRB मुंबई – एकूण ५९६, RRB अहमदाबाद – एकूण ७९) रिक्त पदांचा तपशील –

(१) चिफ कमर्शियल कम टिकेट सुपरवायझर – एकूण १६१ ( RRB मुंबईमधील पदे CR – ५, WR – १३) ( RRB अहमदाबाद WR – ७).

(२) स्टेशन मास्टर – एकूण ६१५ ( RRB मुंबई – CR – ४५, SCR – २४, WR – २८) ( RRB अहमदाबाद WR – १९).

(३) गुड्स ट्रेन मॅनेजर – एकूण ३,४१६ ( RRB मुंबई CR – ७३, SCR – १७, WR – २२०) ( RRB अहमदाबाद – WR ३४).

(४) ज्युनियर अकाऊंट्स असिस्टंट कम टायपिस्ट – एकूण ९२१ ( RRB मुंबई CR – ६७, WR – ३१).

(५) सिनियर क्लर्क कम टायपिस्ट – एकूण ६३८ ( RRB मुंबई CR – ५०, WR – २२) ( RRB अहमदाबाद WR – १९).

(६) ट्रॅफिक असिस्टंट – एकूण ५९ (मेट्रो कोलकाता – ५९)( RRB मुंबई – ०).

पात्रता – (२० नोव्हेंबर २०२५ रोजी) सर्व पदांसाठी पदवी उत्तीर्ण. पद क्र. ४ ज्युनियर अकाऊंट्स असिस्टंट कम टायपिस्ट आणि पद क्र. ५ सिनियर क्लर्क कम टायपिस्ट पदांसाठी संगणकावरील हिंदी/इंग्लिश टायपिंग प्रोफिशियन्सी अनिवार्य आहे.

वयोमर्यादा – (१ जानेवारी २०२६ रोजी) १८ ते ३३ वर्षे ( UR EWS उमेदवारांचा जन्म दि. १ जानेवारी २००८ ते २ जानेवारी १९९३ दरम्यानचा असावा.)

कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; (अपंग खुला/ईडब्ल्यूएस – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/ अज – १५ वर्षे); (३ वर्षांची सेवा झालेले रेल्वे कर्मचारी (ग्रुप-सी आणि पूर्वीचे ग्रुप-डी) खुला/ईडब्ल्यूएस – ४ वर्षे, इमाव – ७ वर्षे, अजा /अज – ९ वर्षे);

(वयोमर्यादा – विधवा, घटस्फोटीत, कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे)

अनआरक्षित पदांसाठी अजा/अज/इमावच्या उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार नाही.

वेतन श्रेणी – पद क्र. १ व २ साठी पे-लेव्हल – ६ (रु. ३५,४००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ६८,०००/-; पद क्र. ३ ते ५ साठी पे-लेव्हल – ५ (रु. २९,२००) अंदाजे वेतन दरमहा रु. ५७,०००/-; पद क्र. ६ साठी पे-लेव्हल – ४, अंदाजे वेतन दरमहा रु. ५२,०००/-.

निवड पद्धती – स्टेज-१ – कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट ( CBT) (सर्व पदांसाठी सामायिक) जनरल अवेअरनेस – ४० प्रश्न, मॅथेमॅटिक्स – ३० प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – ३० प्रश्न, एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण असे एकूण १०० गुण, वेळ ९० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील. CBT मधील नॉर्मलाईज्ड् केलेल्या गुणवत्तेनुसार उमेदवार स्टेज-२ CBT साठी निवडले जातील. (अंदाजे रिक्त पदांच्या १५ पट)

स्टेज-२ – ( i) CBT – जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, मॅथेमॅटिक्स – ३५ प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग – ३५ प्रश्न, एकूण १२० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १२० गुण, वेळ ९० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.

( ii) स्टेशन मास्टर/ट्रॅफिक असिस्टंट पदांसाठी – स्टेज-२ CBT उत्तीर्ण करणाऱया उमेदवारांना कॉम्प्युटर बेस्ड् अॅप्टिट्यूड टेस्ट ( CBAT) द्यावी लागेल. सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना CBAT उत्तीर्ण करण्यासाठी प्रत्येक टेस्ट बॅटरीमध्ये किमान T Score ४२ मिळवावा लागेल.

( iii) कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट ( CBTST) – सिनियर क्लर्क कम टायपिंग आणि ज्युनियर अकाऊंट्स असिस्टंट कम टायपिस्ट पदांसाठी उमेदवारांना टायपिंग स्किल टेस्ट (CBTST) द्यावी लागेल. हे गुण गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.)

( iv) कागदपत्र पडताळणी आणि वैद्याकीय तपासणी

परीक्षा शुल्क – (१) रु. ५००/- (जे उमेदवार स्टेज-१ सीबीटीला बसतील, त्यांना रु. ४००/- बँकिंग चार्जेस वगळता परत केले जातील.) (२) अजा/अज/माजी सैनिक/अपंग /महिला/ट्रान्सजेंडर/अल्पसंख्यांक/ ईबीटी) यांना २५०/-

मुंबई RRB मधील पदांसाठी http://www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर २० नोव्हेंबर २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. (RRB मुंबईचा संपर्क क्रमांक – ०२२-६७६४४०३३)

युको बँकेत संधी

● युको बँक ( UCO Bank) (भारत सरकारचा उपक्रम) अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत अॅप्रेंटिसेसची भरती. एकूण पदे – ५४४. महाराष्ट्रातील रिक्त पदे – ३३ (अजा – ५, अज – २, इमाव – ९, इडब्ल्यूएस – २, खुला – १५ (१ पद अपंग कॅटेगरी HI साठी राखीव)).पात्रता – (१ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यानंतर) पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – ( १ ऑक्टोबर २०२५ रोजी) २० ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९६ ते १ जुलै २००४ दरम्यानचा असावा.) कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; अपंग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा /अज – १५ वर्षे.

विधवा, घटस्फोटीत, कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – खुला – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे.

अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना दरमहा रु. १५,०००/- स्टायपेंड दिला जाईल.

टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज – उमेदवारांनी ज्या राज्यातील पदांसाठी अर्ज केला आहे त्या राज्यातील स्थानिय भाषेची परीक्षा द्यावी लागेल. (ज्या उमेदवारांनी १० वी/१२ वीला संबंधित राज्यातील स्थानिय भाषा अभ्यासली असेल त्याचा पुरावा सादर केल्यास त्यांना लँग्वेज टेस्ट द्यावयाची गरज नाही.)

निवड पद्धती – उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. ज्यात जनरल/फिनान्शियल अवेअअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग अॅबिलिटी अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड या विषयांवरील प्रत्येकी २५ प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १०० गुण, वेळ ६० मिनिटे. गुणवत्ता यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. बँक निवड पद्धतीमध्ये बदल करू शकते.

अर्जाचे शुल्क – खुला/इमाव/ईडब्ल्यूएस – रु. ८००/-; अपंग – रु. ४००/-; अजा/अज यांना फी माफ आहे.

बीएफएसआय सेक्टर स्किल काऊन्सिल ऑफ इंडिया ( BFSI SSCI) ऑनलाइन परीक्षेसाठीची लिंक परीक्षेच्या एक दिवस अगोदर उपलब्ध करून देईल. उमेदवारांनी अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर अपलोड केलेला आधारकार्ड परीक्षेच्या वेळी स्क्रिनवर डिस्प्ले करावा लागेल. ऑनलाइन परीक्षा उमेदवारांना आपल्या घरून देता येईल. याविषयीच्या सूचना उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील.

ऑनलाइन अर्ज कसा करावा याची विस्तृत माहिती बँकेच्या http://www.uco.bank.in या वेबसाईटवरील जाहिरातीमधील पॅरा-जे ( J) मधे उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ५ नोव्हेंबर २०२५.