सुहास पाटील

मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, भारत सरकार अंतर्गत सायंटिफिक सोसायटी – सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C- DAC), Pune. (Advt. No. CORP/ JIT//०६/२०२३). CDAC च्या देशभरातील सेंटर्स/ लोकेशन्समध्ये करार पद्धतीने भरती.

(१) प्रोजेक्ट इंजिनीअर/ फिल्ड अ‍ॅप्लिकेशन इंजिनीअर – १५० पदे.

कामाचे ठिकाण : मुंबई, पुणे, बेंगळूरु, हैदराबाद, दिल्ली इ. भारतभरात कोठेही.

पात्रता B. E./ B. Tech. किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतुल्य CGPA सह उत्तीर्ण. किंवा सायन्स/ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स किंवा संबंधित डोमेनमधील पदव्युत्तर पदवी किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतुल्य CGPA सह उत्तीर्ण किंवा M. E./ M. Tech.. किंवा Ph.D.

उमेदवाराकडे संबंधित कौशल्य संचापैकी एका डोमेनमधील कौशल्य अवगत असावे. (I) कॉम्प्युटर सायन्स, (II) आयटी, (III) कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स, (IV) AI (V) ML (VIर) डेटा सायन्स, (VII) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन, (VIII) कम्युनिकेशन, (IX) इन्स्ट्रमेंटेशन, (X) इलेक्ट्रिक, (XI) इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, (XII) VLSI Design,, (XIII) जीओफिजिक्स, (XIV) सिव्हील, (XXV) मेकॅनिकल/ मेकॅट्रॉनिक्स, (XXVI फिजिक्स/ अ‍ॅप्लाईड फिजिक्स, (XXVII) मार्केटिंग इ.

(२) प्रोजेक्ट इंजिनिअर (पेटेंट्स) – २ पदे. कामाचे ठिकाण : पुणे, दिल्ली इ.

पात्रता : B. E./ B. Tech. किंवा समतुल्य पदवी किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतुल्य CGPA सह उत्तीर्ण. (्र) सायन्स/ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन किंवा संबंधित डोमेनमधील पदव्युत्तर पदवी किमान ६० टक्के गुणांसह किंवा समतुल्य CGPA सह उत्तीर्ण. M. E./ M. Tech..

पद क्र. १ व २ साठी अनुभव – शून्य ते चार वर्षेपर्यंत.

वयोमर्यादा : ३५ वर्षेपर्यंत.

वेतन : रु. ४.४९ ते ७.११ लाख प्रतीवर्ष. (उच्च अनुभवधारी उमेदवारांना अधिकचे वेतन दिले जाईल.)

(३) प्रोजेक्ट असिस्टंट – ३५ पदे.

कामाचे ठिकाण : तिरुअनंतपुरम.

पात्रता : कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग/ आयटी/ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/ मेकॅनिकल/ मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअिरग/ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील डिप्लोमा इंजिनीअिरग.

अनुभव : किमान ४ वर्षांचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा : ३५ वर्षे.

वेतन : किमान रु. ३.३४ लाख प्रती वर्ष.

(४) प्रोजेक्ट असोसिएट/ ज्युनियर फिल्ड अ‍ॅप्लिकेशन इंजिनीअर – ४ पदे.

कामाचे ठिकाण : तिरुअनंतपुरम, सिलचार, गुवाहाटी इ.

पात्रता : (I) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ मशिन लर्निग/ मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटिंग/ डेटा सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/ जीओफिजिक्स इ. विषयातील इंजिनीअिरग पदवी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा (II) सायन्स/ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मधील पदव्युत्तर पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा M. E./ M. Tech.

अनुभव : आवश्यक नाही.

वयोमर्यादा : ३० वर्षे.

(५) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (अकाऊंट्स) – २ पदे.

कामाचे ठिकाण : मुंबई.

पात्रता : कॉमर्समधील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा M. Com.

अनुभव : पदवीधर उमेदवारांसाठी किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. पदव्युत्तर पदवीकारकांसाठी अनुभव आवश्यक नाही. Tally ERPचे ज्ञान; Excel and Word ज्ञान आवश्यक. वेतन : रु. ३ लाख प्रती वर्ष.

वयोमर्यादा : ३५ वर्षे.

(६) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ ((HRD)) – ३ पदे. कामाचे ठिकाण : पुणे, पाटणा.

पात्रता : पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर पदवी शक्यतो एमबीए (एचआर) किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

अनुभव : पदवीधर उमेदवारांसाठी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. पदव्युत्तर पदवीधारकांना अनुभव आवश्यक नाही.

वेतन : रु. ३ लाख प्रती वर्ष.

वयोमर्यादा : ३५ वर्षे.

(७) प्रोजेक्ट टेक्निशियन – ८ पदे.

कामाचे ठिकाण : तिरुअनंतपुरम.

पात्रता : COPA/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ मेकॅनिकल फिटर ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण.

अनुभव : किमान ३ वर्षे.

वेतन : रु. ३.२८ लाख प्रती वर्ष.

(८) सिनियर प्रोजेक्ट इंजिनीअर/ मॉडय़ुल लिड/ प्रोजेक्ट लिड/ प्रोडक्ट सव्‍‌र्हिस अ‍ॅण्ड आऊटरिच – ५० पदे.

कामाचे ठिकाण : बेंगळूरु, हैदराबाद, दिल्ली, चेन्नई इ.  वेतन : सीटीसी ८.४९ ते १४ लाख प्रतीवर्ष. अनुभव : ९-१५ वर्षे.

(९) प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर – २५ पदे.

कामाचे ठिकाण : पुणे, मुंबई, बंगळूरु इ.

वेतन : रु. १२.६३ ते २२.९ लाख प्रतीवर्ष.

पद क्र. ८ व ९ साठी (I) पात्रता : बी.ई./ बी.टेक. किमान ६० टक्के गुण किंवा M.Sc./ M.C.A.किमान ६० टक्के गुण/ एम.ई./ एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी/ AI/ MI B.

(ii) इष्ट पात्रता : M.B.A.मार्केटिंग.

(iii) अनुभव : ३ ते ७ वर्षांचा अनुभव आवश्यक.

(१०) प्रोजेक्ट ऑफिसर (आऊटरिच अ‍ॅण्ड प्लेसमेंट) – १ पद.

कामाचे ठिकाण : हैदराबाद.

(११) प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ (हिंदी सेक्शन) – १ पद.

कामाचे ठिकाण : मुंबई.

पात्रता : हिंदी विषयातील पदवी किंवा हिंदी एका विषयासह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

अनुभव : ३ वर्षे.  वेतन – रु. ३ लाख प्रतीवर्ष. अर्जाचे शुल्क : कोणतेही अर्जाचे शुल्क नाही. शंकासमाधानासाठी recruitment@cdac. In ऑनलाइन अर्ज www. careers. cdac. In या संकेतस्थळावर दि. २० ऑक्टोबर २०२३ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत. इटरव्ह्य़ूची तारीख ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MSETCL) – महाराष्ट्र सरकारची पूर्ण मालकी असलेली कॉर्पोरेट संस्था (Employment Advt. No. ०७/२०२३) – असिस्टंट इंजिनिअर (ट्रान्समिशन) आणि असिस्टंट इंजिनिअर (टेलीकम्युनिकेशन) पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ३९६.

(१) असिस्टंट इंजिनिअर (ट्रान्समिशन) – ३९० पदे (अजा – ४९, अज – ३२, विजा-अ – १३, भज-ब – ९, भज-क – १४, भज-ड – ६, विमाप्र – ५, इमाव – ८५, ईडब्ल्यूएस – ३९, खुला – १३८) महिलांसाठी आरक्षित पदे – ११९ (अजा – १५, अज – १०, विजा-अ – ४, भज-ब – ३, भज-क – ४, भज-ड – २, विमाप्र – २, इमाव – २६, ईडब्ल्यूएस – १२, खुला – ४१) खेळाडूंसाठी – १९ पदे आरक्षित; अनाथांसाठी ४ पदे आरक्षित (१६ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी (प्रत्येकी ४ पदे कॅटेगरी (a) D/ HH, (b) OL/ CP/ LC, (c) ASD (M) SLD, MI, (d) MD  साठी राखीव).)

पात्रता : असिस्टंट इंजिनीअर (ट्रान्समिशन) – इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग/ टेक्नॉलॉजी पदवी.

असिस्टंट इंजिनीअर (टेलीकम्युनिकेशन) – ६ पदे (अजा – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४). पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअिरग/ टेक्नॉलॉजी पदवी.

वेतन श्रेणी : रु. ४९,२१० – २१६५..११९३१५, अंदाजे वेतन दरमहा रु. ८४,४०७/-.

दोन्ही पदांसाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी (Domicile) असावा.

ही सर्व entry level ची असल्यामुळे अनुभवाची आवश्यकता नाही.

वयोमर्यादा : दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी खुला प्रवर्ग – ४० वर्षे, आरक्षित प्रवर्ग, ईडब्ल्यूएस, अनाथ, खेळाडू – ४५ वर्षे.

निवड पद्धती : ऑनलाइन टेस्ट (लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप (१) टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज – ५० प्रश्न, ११० गुण; (२) टेस्ट ऑफ जनरल अ‍ॅप्टिटय़ूड – (ए) टेस्ट ऑफ रिझिनग – ४० प्रश्न, २० गुण), (बी) टेस्ट ऑफ क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – २० प्रश्न, १० गुण, (सी) टेस्ट ऑफ मराठी लँग्वेज – २० प्रश्न, १० गुण; एकूण १३० प्रश्न, १५० गुण, वेळ १२० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. वरील ४ टेस्टपैकी कोणत्याही टेस्टमध्ये शून्य अथवा शून्यापेक्षा कमी गुण असता कामा नये. ऑनलाइन टेस्टमधील कामगिरीवर आधारित निवड यादी बनविली जाईल. लेखी परीक्षेतील १५० गुणांना १०० गुणांत रूपांतरित केले जाईल. खुल्या प्रवर्गासाठी पात्रतेकरिता किमान ३० गुण मिळविणे आवश्यक. तसेच इतर उमेदवारांना १०० पैकी २० गुण मिळविणे आवश्यक.

परीक्षा केंद्र : अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ टटफ, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर.

अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्ग – रु. ७००/, मागासवर्गीय/ ईडब्ल्यूएस /अनाथ – रु. ३५०/-, दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे. ऑनलाइन अर्ज https:// ibpsonline. ibps. in/ msetclaug23 या संकेतस्थळावर दि. २४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत करावेत.