● इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स/ टेक्निशियन डिप्लोमा ॲप्रेंटिसेसची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ( BPCL), मुंबई रिफायनरी (भारत सरकारचा उपक्रम), माहुल, मुंबई येथे एक वर्ष कालावधीच्या ॲप्रेंटिसेस ॲक्ट १९६१ अंतर्गत एकूण १६० जागांवर भरती.
( I) कॅटेगरी-१ डिसिप्लिननुसार ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेसच्या रिक्त जागांचा तपशील – एकूण ८९ पदे.
(१) केमिकल इंजिनीअरिंग – २२ (२) सिव्हील इंजिनीअरिंग – १४
(३) इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर सायन्स – ३ (४) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – ११
(५) इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स – ७ (६) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – २६
(७) फायर अँड सेफ्टी – ६
पात्रता – संबंधित विषयातील फर्स्ट क्लास इंजिनीअरिंग पदवी (पूर्ण वेळ) किमान ६.३ CGPA. पात्रता परीक्षा २०२१, २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये उत्तीर्ण केलेली असावी.
( II) कॅटेगरी-२ डिसिप्लिननुसार टेक्निशियन डिप्लोमा/नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स अॅप्रेंटिसेसच्या रिक्त जागांचा तपशिल – एकूण ५५ पदे.
(१) केमिकल इंजिनीअरिंग – ७ (२) सिव्हील इंजिनीअरिंग – ९
(३) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – १३ (४) इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स – ८
(५) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – १८
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदविका किमान ६० टक्के गुण (अजा/अज/अपंग – ५० टक्के) पात्रता परीक्षा २०२१/ २०२२/२०२३/२०२४/२०२५ मध्ये उत्तीर्ण केलेली असावी.
( III) नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट रिक्त जागांचा तपशिल – एकूण १६ पदे.
(६) B. Sc. (केमिस्ट्री) नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट – ५ (७) B. Com./ BBI/ BAF/ BMS/ BCS/ BSW – ११
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
पात्रता परीक्षा २०२१/ २०२२/ २०२३/२०२४/२०२५ मध्ये उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – १८२७ वर्षे.
स्टायपेंड – ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेससाठी रु. २५,०००/- दरमहा.
टेक्निशियन डिप्लोमा/नॉन-इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्स अॅप्रेंटिसेससाठी रु. १८,०००/- दरमहा.
निवड पद्धती – पदवी/पदविकामधील गुणवत्तेनुसार उमेदवार इंटरव्ह्यूकरिता शॉर्ट लिस्ट केले जातील. अंतिम निवड यादी कॅटेगरीनुसार पात्रता परीक्षेतील गुण आणि इंटरव्ह्यूमधील गुण विचारात घेऊन बनविली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची नेमणूक वैद्याकीय परीक्षेनंतर केली जाईल.
शंकासमाधानासाठी फोन नं. ०२२३१०७३५३२/३५३१.
NATS पोर्टलवर एन्रोलमेंट करून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., मुंबई रिफायनरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २ ऑक्टोबर २०२५ आहे.
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणात इंटर्नशिपची संधी
● नॅशनल बायोडाव्हर्सिटी अथॉरिटी ( NBA) म्हणजेच राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण ही भारत सरकारची एक स्वायत्त, वैधानिक संस्था आहे. जैविक विविधता कायदा लागू करणे, जैवविविधता संवर्धनासाठी राज्ये आणि स्थानिक संस्थांना तांत्रिक सहाय्य प्रदान करणे याविषयी शिकायचे आहे, अशा पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना NBA मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी. NBA चे मुख्यालय, चेन्नई येथे आहे. ६ वी बायोडायव्हर्सिटी संरक्षण इंटर्नशिप प्रोग्राम ( BSIP- VI) इंटर्नशिपसाठी जागा उपलब्ध – एकूण ५० (कालावधी १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२६)).
इंटर्नशिपचे ठिकाण – पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय ( MoEFCC), राष्ट्रीय जैवविविधता पाधिकरण ( NBA), राज्य जैवविविधता मंडळ/केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषद (UT Biodivertsity Council किंवा इतर संबंधित संस्था).
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. (३ वर्षं कालावधीची पदवी धारण करणारे उमेदवार पदव्युत्तर पदवी घेत आहेत ते अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यांना दि. १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत कोर्स पूर्ण झाल्याचे सर्टिफिकेट सादर करावे लागेल.) किंवा इंजिनीअरिंग पदवी किंवा अॅग्रिकल्चर/फॉरेस्ट्री/हॉर्टिकल्चर/वेटेरिनरी सायन्सेस इ. मधील ४ वर्षं कालावधीची पदवी.
वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. ३० सप्टेंबर २००४ आणि दि. १ ऑक्टोबर १९९५ दरम्यानचा असावा.)
स्टायपेंड – दरमहा रु. २३,५००/-.
निवड पद्धती – जैवविविधतेचे पैलू आणि नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट मुख्यत्वे करून जैविक विविधतेवरील अधिवेशने आणि प्रोटोकॉल्स त्यासंबंधी भारताचे अहवाल (NR52 and N3 इ. याशिवाय बायोलॉजिकल सायन्सेस (जसे की, बॉटनी, झूऑलॉजी, बायोडायव्हर्सिटी, पर्यावरणशास्त्र, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री, जेनेटिक इंजिनीअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, प्लांट ब्रीडिंग इ.) विषयांवर आधारित ऑनलाइन परीक्षा ऑक्टोबर २०२५ मध्ये घेतली जाईल. BSIP- VI याविषयी अधिक माहितीसाठी www.nbaindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज nbaindia.org या संकेतस्थळावर दि. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत करावेत. ऑनलाइन परीक्षा ८ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित केली जाईल.