इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) आपल्या ११ सहयोगी बँकांमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या सन २०२६-२७ करिता भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस अंतर्गत ऑनलाइन एक्झामिनेशन (प्रीलिमिनरी/मेन्स) ऑगस्ट/ऑक्टोबर, २०२५ मध्ये घेणार आहे. ११ सहयोगी बँकांमधून ८ बँकांमधील एकूण रिक्त पदे ५,२०८. (अजा – ७८२, अज – ३६५, इमाव – १,३३७, ईडब्ल्यूएस- ५२०, खुला – २,२०४) (दिव्यांग उमेदवारांसाठी एकूण २३१ पदे राखीव – (एचआय- ६४, ओसी – ५२, व्हीआय – ५४, आयडी – ६१)).
रिक्त पदांचा तपशील – बँक ऑफ इंडिया – ७०० पदे, पंजाब अँड सिंध बॅंक – ३५८ पदे, कॅनरा बँक – १००० पदे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया – ५०० पदे, पंजाब नॅशनल बँक – २०० पदे, इंडियन ओव्हरसिज बँक – ४५० पदे, बँक ऑफ महाराष्ट्र – १००० पदे, बँक ऑफ बरोडा – १००० पदे, (युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, यूको बँक यांनी रिक्त पदे कळविली नाहीत.)
पात्रता – ( २१ जुलै २०२५ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.
वयोमर्यादा – ( १ जुलै २०२५ रोजी) २० ते ३० वर्षे (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, दिव्यांग – ४० वर्षेपर्यंत).
वेतन श्रेणी – रु. ४८,४८० – २०००/७ – ८५,९२०.
निवड पद्धती – कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस – ऑनलाइन एक्झामिनेशन्स – प्रीलिमिनरी आणि मेन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू.
(अ) प्रीलिमिनरी एक्झामिनेशन (ऑगस्ट २०२५) – १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे (इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, ३० गुण; क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड – ३५ प्रश्न, ३० गुण; रिझनिंग अॅबिलिटी – ३५ प्रश्न, ४० गुण; वेळ प्रत्येकी २० मिनिटे) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची.
(ब) मेन एक्झामिनेशन (ऑक्टोबर २०२५) – (i) ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न एकूण १४५, गुण २००, वेळ १६० मिनिटे. (१) रिझनिंग – ४० प्रश्न, ६० गुण, वेळ ५० मिनिटे; (२) जनरल/इकॉनॉमि/बँकींग अवेअरनेस/डिजिटल/फिनान्शियल अवेअरनेस (RBI परिपत्रकासह) – ३५ प्रश्न, ५० गुण, वेळ २५ मिनिटे; (३) इंग्लिश लँग्वेज – ३५ प्रश्न, ४० गुण, वेळ ४० मिनिटे; (४) डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन – ३५ प्रश्न, ५० गुण, वेळ ४५ मिनिटे. (ii) डिस्क्रीप्टिव्ह टाईप – इंग्लिश लँग्वेज (लेटर अँड एस्से रायटिंग) २ प्रश्न, २५ गुण, वेळ ३० मिनिटे.
ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ०.२५ गुण वजा केले जातील.
(क) मुख्य परीक्षेमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची पर्सोनॅलिटी टेस्ट घेतली जाईल. ती फक्त पात्रता स्वरूपाची असेल. (नोव्हेंबर/डिसेंबर २०२५)
(ड) इंटरव्ह्यू- ऑनलाइन मेन एक्झाममधून निवडलेल्या उमेदवारांची १०० गुणांसाठी मुलाखत डिसेंबर २०२५/जानेवारी २०२६ मध्ये घेतली जाईल. मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लेखी परीक्षेतील गुण प्रसिद्ध केले जातील.
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – प्रीलिमिनरी एक्झाम – अकोला, अहिल्यानगर, भंडारा, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई/नवी मुंबई/ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, गोवा – पणजी.
मेन एक्झामकरिता – अमरावती, अहिल्यानगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, छ. संभाजी नगर, मुंबई/नवी मुंबई/ठाणे/एमएमआर, नागपूर, पुणे, गोवा-पणजी.
अर्जाचे शुल्क – अजा/अज/दिव्यांग यांचेसाठी रु. १७५/-, इतरांसाठी रु. ८५०/-.
प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग – अजा/अज/इमाव/अल्पसंख्यांक उमेदवारांना नोडल बँकांमार्फत विनामूल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षण (परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी) छ. संभाजी नगर, मुंबई, नागपूर, पुणे, पणजी इ. केंद्रांवर ऑगस्ट २०२५ मध्ये दिले जाईल. अर्ज भरताना उमेदवारांनी तसे नमूद करावे. प्रवास खर्च, राहण्या/खाण्याचा खर्च उमेदवारांना स्वत करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज http://www.ibps.in या संकेतस्थळावर २१ जुलै २०२५ पर्यंत करावेत.
शंकासमाधानासाठी https://cgrs.ibps.in/ या वेबसाईटवर संपर्क करा.