Maharashtra Board 10th Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. आज २७ मे २०२४ रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची तारीख जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांची आणि त्यासोबतच पालकांचीही धाकधूक वाढली आहे. तर अकरावीची पूर्व प्रवेश प्रक्रिया परवापासूनच सुरू झाली आहे. याचदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र बोर्डानं निकालाआधीच विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही दिलासा मिळणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान पेपर १ मधील त्या एका प्रश्वाच्या गोंधळामुळे पूर्ण गुण मिळणार आहेत. यावर्षी, दहावीच्या परीक्षेच्या विज्ञान-१ च्या पेपरमध्ये विचारलेल्या “अणूच्या सर्वात लहान आकाराच्या – हेलियम किंवा हायड्रोजनच्या नावा”वरून गोंधळ झाल्यानंतर, महाराष्ट्र बोर्डाने यासंदर्भात स्पष्टिकरण दिले आहे. विज्ञान-१ च्या पेपरमधील दोन्ही उत्तरे बरोबर मानली जातील. ज्या विद्यार्थ्यांनी दोन्हीपैकी कोणतेही उत्तर दिले असेल त्यास पूर्ण गुण दिले जातील.

दहावीचा निकाल जिथं पाहणार त्या वेबसाईटची यादी

१. https://mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. https://results.targetpublications.org/

असा पाहा निकाल

१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

२. होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा.

३. स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा.

४. थोड्या वेळात तुमचं निकाल जाहीर होईल, निकाल मिळाल्यावर पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा अथवा त्याची छापील प्रत काढून घ्या.

हेही वाचा >> Maharashtra Board 10th SSC Result 2024 Live: आज दहावीचा निकाल!  विज्ञानाच्या पेपरमध्ये ‘या’ प्रश्नाला मिळणार पूर्ण मार्क, अपडेट्स वाचा

५. विद्यार्थ्यांना निकाल लागल्यावर मूळ छापील प्रत ही काही दिवसांनतर त्यांच्या शाळांमध्ये दिली जाणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल एसएमएसद्वारे कसा पहावा

१. तुमच्या मोबाइलमध्ये एसएमएसचं अॅप घ्या.
२. यामध्ये महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी निकाल २०२४ साठी MHSSC सीट क्रमांक टाइप करा .
३. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२वी निकाल २०२४ साठी MHHSC सीट क्रमांक टाइप करा .
४. त्यानंतर ५७७६६ वर एसएमएस पाठवा.

निकालानंतर किती दिवसांनी मिळतील गुणपत्रिका ?

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर केल्यांतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात गुणपत्रिकेची ओरिजनल हार्ड कॉपी देण्यात येईल.