How To Prepare For UPSC : आयएएस किंवा पीसीएस अधिकारी बनणे हे देशातील अनेक तरुण मंडळींचे स्वप्न असते. पण, जेव्हा या पदांसाठी परीक्षा (UPSC Exams) देण्याची वेळ येते. तेव्हा परीक्षेची तयारी नेमकी कशी करायची हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. म्हणून अनेक विद्यार्थी परीक्षा देण्याचेही धाडस करीत नाहीत. ही भीती त्यात अभ्यासासाठी लागणारे तासन् तास , कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित करायचे, कोणत्याही पार्श्वभूमीतील व्यक्ती यूपीएससी परीक्षेची तयारी करू शकतात की नाही किंवा परीक्षेसाठी एनसीईआरटीची (NCERT) पुस्तके वाचायची की नाहीत आदी अनेक प्रश्न उमेदवारांसमोर उभे राहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी लाखो विद्यार्थी आयएएस किंवा पीसीएस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तर दिल्ली परिसरातील मुखर्जी नगरमध्ये (Mukherjee Nagar) येतात. तर, मुखर्जी नगरमधील विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी काही (UPSC Exams) टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्स केवळ परीक्षेच्या तयारीतच मदत करीत नाहीत, तर विद्यार्थी कोचिंगसह यूपीएससी परीक्षा चांगल्या गुणांनी कशा प्रकारे पास होऊ शकतात हेसुद्धा त्यात सांगितले आहे.

यूपीएससीचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे (UPSC Exams)

मुखर्जी नगरमधील विद्यार्थ्यांनी सांगितले की, प्रशिक्षणाबरोबरच स्वतः अभ्यास (सेल्फ स्टडी) करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सेल्फ स्टडीसाठी जितका जास्त वेळ द्याल, तितक्या या परीक्षेबाबतच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील. यूपीएससीची तयारी करण्यापूर्वी (UPSC Exams) स्वतःला शिस्त लावणेही महत्त्वाचे आहे. किमान आठ तास सेल्फ स्टडी आणि पाच तास प्रशिक्षणासाठी द्या. कारण- यूपीएससीचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे आणि तुम्हाला प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. यूपीएससीची तयारी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने हे लक्षात ठेवले पाहिजे की, एनसीईआरटीची (NCERT) पुस्तके संपूर्ण तयारीच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

जर कोणी एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकांचा सातत्याने अभ्यास केला, तर तो उमेदवार वा विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. तुम्ही यूपीएसी परीक्षा कोचिंगशिवायही देऊ शकता. पण, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश केल्याने तुमच्या अभ्यास करण्याच्या तयारीला एक नवीन दिशा मिळेल आणि तुमच्या संकल्पना स्पष्ट होण्यात आणखीन मदत होईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prepare for the upsc exams mukherjee nagar students share tips for how to pass without coaching asp