Success Story of Ramlal Bhoi : प्रत्येक यशोगाथा ही एका स्वप्नाने सुरू होते. पण, हे स्वप्न साध्य करण्याचा मार्ग अनेकदा आव्हानांनी भरलेला असतो. त्यामुळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यात जे लोक संघर्ष करतात त्यांनाच यश मिळते. कारण मोठ्या यशासाठी संघर्षदेखील मोठाच करावा लागतो. याचे सर्वात मोठे आणि उत्तम उदाहरण म्हणजे रामलाल भोई या तरुणाची ही यशोगाथा आहे. त्याचा हा प्रवास मात्र कठोर परिश्रम, दृढनिश्चय, त्याच्या स्वप्नांवरील अतूट विश्वासाचा दाखला ठरतो आहे. चला तर जाणून घेऊया रामलाल भोईची यशोगाथा (Success Story )…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानच्या चित्तौडगड जिल्ह्यातील घोसुंदा गावातील रहिवासी असलेल्या रामलालचे वयाच्या ११ व्या वर्षीच लग्न झाले होते, जेव्हा तो इयत्ता सहावीत होता. त्याच्या गावात बालविवाह सर्रास सुरू असायचे. पण, त्यावेळी रामलालला स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. मात्र, त्याच्या वडिलांनी शिक्षण पूर्ण करण्याच्या त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला नाही. पण, त्याच्या लग्नानंतर त्याला लक्षात आले की, बालविवाह ही एक चुकीची प्रथा आहे, जी थांबवणे आवश्यक आहे.

हेही वाचा…Success Story : इच्छा तेथे मार्ग! सहा लाख रुपयांची नोकरी सोडून शेतकऱ्याच्या मुलानं गाठलं परदेश; वाचा मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप लाँच करणाऱ्याची यशोगाथा

शिक्षकाने केले मार्गदर्शन :

एवढी आव्हाने असूनही रामलालने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोडले नाही. या कठीण प्रसंगात त्याच्या पत्नीने साथ दिली; जिचं शिक्षण फक्त इयत्ता दहावीपर्यंत झाले होते. मात्र, त्यांनी रामलालच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाला पूर्ण होण्यास मदत केली. रामलालने स्थानिक सरकारी शाळेत १०वीपर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण केले, तेव्हा त्याला ७४ टक्के गुण मिळाले. उच्च शिक्षणासाठी कोणतं क्षेत्र निवडायचे हे निश्चित नसल्यामुळे, त्याला एका शिक्षकाने मार्गदर्शन केले. त्या शिक्षकाने रामलालमधील विज्ञानातील क्षमता ओळखली आणि त्याला जीवशास्त्राचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित केले.

रामलालचा डॉक्टर होण्याचा प्रवास २०१९ मध्ये NEET मध्ये त्याच्या १२वीच्या परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नाने सुरू झाला, जिथे त्याने स्व-अभ्यासातून ३५० गुण मिळवले. २०२० आणि २०२१ मध्ये त्याच्या त्यानंतरच्या प्रयत्नांमध्ये, त्याने अनुक्रमे ३६२ आणि ३२० गुण मिळवले. तिसऱ्या प्रयत्नानंतर तो कोचिंगसाठी एलेन कोटामध्ये सामील झाला; ज्याने त्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान केले. त्याच्या मेहनतीचे फळ नीट २०२३ (NEET 2023) मध्ये त्याच्या पाचव्या प्रयत्नात मिळाले; जिथे त्याने ७२० पैकी ६३२ गुण मिळवून वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निश्चित केले.

रामलाल भोई या राजस्थानच्या रहिवाश्याने पाचव्या प्रयत्नात राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा – अंडरग्रॅजुएट (NEET UG) परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी असंख्य अडथळ्यांवर मात केली. त्यामुळे रामलालची चिकाटी, दृढनिश्चयाची प्रेरणादायी कहाणी हे सिद्ध करते की आव्हाने आली तरी कठोर परिश्रम आणि योग्य पाठिंब्याने यश मिळवता येते हे निश्चित आहे. तर असा होता रामलाल भोई याचा प्रवास (Success Story) …

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of ramlal bhoi who was forced to marry at 11 but make study hard and dcracked neet exam in fifth attempt asp