RRB Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच आरआरबीने (RRB) तात्पुरती टाइमलाइन असलेली अधिकृत नोटीस जारी केली होती. आता आरआरबीने भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाच्या अंतर्गत ‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड १ व ग्रेड २ या पदांसाठी भरती मोहीम राबवली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://indianrailways.gov.in/ येथे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ मार्चपासून सुरू होईल आणि अर्जाची शेवटची तारीख ४ एप्रिल २०२४ अशी असणार आहे. तर अर्ज करण्यासाठी रिक्त पदे, पगार यांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

RRB Recruitment 2024 : पद

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत (RRB) ‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड १ व ग्रेड २ या पदांसाठी एकूण नऊ हजार रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती राबविण्यात येत आहे.

RRB Recruitment 2024 : रिक्त जागा व तपशील

‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड १ सिग्नलसाठी – १,१०० जागा.
‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड २ साठी – ७,९०० जागा.
एकूण = ९,००० जागा.

हेही वाचा…DSSSB recruitment 2024: डीएसएसएसबीमध्ये ‘या’ पदाच्या ५६७ जागांसाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण तपशील

RRB Recruitment 2024 : परीक्षा शुल्क

सामान्य वर्गातील (जरनल कॅटेगरी) उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५०० रुपये आहे. तर, SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) उमेदवारांसाठी २४० रुपये शुल्क आहे.

RRB Recruitment 2024 : पगार

‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड १ – २९,२०० रुपये पगार.

‘तंत्रज्ञ’ (टेक्निशियन) ग्रेड २ – १९,९०० रुपये पगार.

RRB Recruitment 2024 : परीक्षा पद्धती

भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची संगणकावर आधारित चाचणी (CBTs) परीक्षा ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The railway recruitment board has released a notification for the technician post process start from 9 march asp