UPSC CSE Result 2023 : नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात आलेल्या UPSC परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल आज म्हणजेच १६ एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. नागरी सेवा परीक्षेत मुलाखतीला बसलेले सर्व उमेदवार त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in वर पाहू शकतात. त्यांचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

निकाल ‘या’ दोन वेबसाइटवर पाहता येईल

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. उमेदवार त्यांचे निकाल अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर पाहू शकतात. निकाल जाहीर करण्यासोबतच आयोग टॉपर्सची यादी आणि त्यांचे गुणही प्रसिद्ध करेल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc civil services result 2023 live cse final result upsc gov in topper list on upsconline nic in ias ips sjr
First published on: 15-04-2024 at 18:15 IST