UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्या पर्यंत पोहोचवतो. या अंतर्गतच आम्ही ‘लोकसत्ता टेस्ट सिरीज’ हा उपक्रमही सुरू केला आहे. याद्वारे दर रविवारी तुमच्या सरावासाठी प्रश्नमंजुषा सादर केली जाते. तसेच त्याची उत्तरंही खाली दिली जातात. या आठवड्यातील प्रश्नमंजुषा पुढील प्रमाणे :

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रश्न क्र. १

त्रीवर्थाच्या हवामान वर्गीकरणानुसार Aw उष्णकटिबंधीय ओला आणि कोरडा (सवाना) प्रकारचे हवामान कुठे आढळते?

पर्यायी उत्तरे :

अ) राजस्थान
ब) ईशान्य राज्ये
क) पश्चिम घाट
ड) उत्तर प्रदेश

प्रश्न क्र. २

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) गांधी-आयर्विन करार भारताच्या सविनय कायदेभंग चळवळीशी संबंधित होता

ब) ५ मार्च १९३४ रोजी या करारावर स्वाक्षरी झाली.

क) गांधी-आयर्विन करारानुसार, गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ बंद केली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याचे मान्य केले.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) अ आणि क
३) ब आणि क
४) वरील सर्व

प्रश्न क्र. ३

आर एल सिंग यांच्या हवामान वर्गीकरणानुसार अर्ध आद्र लिटोरल (Subhumid littoral) प्रकारचे हवामान कुठे आढळते?

पर्यायी उत्तरे :

१) राजस्थान
२) ईशान्य राज्ये
३) पश्चिम घाट
४) तमिळनाडू

प्रश्न क्र. ४

आर एल सिंग यांनी भारताला किती हवामान विभागांत वर्गीकृत केले आहे?

पर्यायी उत्तरे :

१) पाच
२) सहा
३) दहा
४) अकरा

प्रश्न क्र. ५

बृहद अर्थशास्त्राशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे.

अ) बृहद अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा आहे जी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तनाचा आणि कार्यक्षमतेचा अभ्यास करते.

ब) बृहद अर्थशास्त्र ही बेरोजगारी, विकास दर, सकल देशांतर्गत उत्पादन आणि महागाई यासारख्या अर्थव्यवस्थेतील एकूण बदलांवर लक्ष केंद्रीत करते.

क) बृहद अर्थशास्त्राला उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणूनदेखील ओळखले जाते.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) क आणि अ
३) फक्त ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. ६

स्टॅम्प यांनी भारताला किती हवामान क्षेत्रामध्ये विभागले आहे?

पर्यायी उत्तरे :

१) पाच
२) दहा
३) अकरा
४) वरील पैकी नाही

प्रश्न क्र. ७

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) १९६९ मध्ये व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले.

ब) पहिल्या टप्प्यात, भारत सरकारने १४ प्रमुख व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

क) दुसऱ्या टप्प्यात, भारत सरकारने आणखी ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ आणि ड
४) वरील सर्व

प्रश्न क्र. ८

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) राष्ट्रीयीकरण झालेली भारतातील पहिली बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होती.

ब) रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, सर ऑस्बोर्न स्मिथ तर पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी. देशमुख होते.

क) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया १ एप्रिल १९३६ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ अंतर्गत स्थापना करण्यात आली.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) क आणि क
४) फक्क क

प्रश्न क्र. ९

खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहेत :

अ) सर्व समाजांना भेडसावणारी मूलभूत आर्थिक समस्या म्हणजे टंचाई होय.

ब) टंचाईचा देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होतो.

क) आर्थिक समस्या ही संसाधनांच्या कमतरतेमुळे उद्भवते.

पर्यायी उत्तरे :

१) फक्त अ
२) फक्त क
३) अ आणि ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १०

मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय?

पर्यायी उत्तरे :

१) आधुनिक आणि पारंपारिक उद्योग
२) सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र
३) विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूक
४) व्यावसायिक आणि निर्वाह शेती

प्रश्न क्र. ११

खालील पैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१६ अंतर्गत संघासाठी लोकसेवा आयोग आणि प्रत्येक राज्यासाठी एक लोकसेवा आयोग अशी तरतूद करण्यात आली आहे.

ब ) भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३१७ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्ती आणि पदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे.

क) संघ लोकसेवा आयोगाचा सदस्य ६ वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ६५ वर्षे वयापर्यंत यापैकी जे आधी असेल ते पदावर असेल.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि क
२) ब आणि क
३) फक्क क
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १२

खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा :

अ) एखाद्या राज्यातील मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या १५% पेक्षा जास्त असू शकत नाही.

ब) संसद विधानपरिषद रद्द करु शकते किंवा ती निर्माण करु शकते.

क) राज्य विधानमंडळाच्या तरतुदी घटनेच्या भाग VI मधील अनुच्छेद १६९ ते २१३ मध्ये दिल्या आहेत.

ड) विधान परिषदेचे कमाल संख्याबळ विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या एक तृतीयांश इतके निश्चित केले जाते.

प्रश्न क्र. १३

आर एल सिंग यांनी भारताला किती हवामान विभागांत वर्गीकृत केले आहे?

पर्यायी उत्तरे :

१) पाच
२) सहा
३) दहा
४)अकरा

प्रश्न क्र. १४

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) विकासाचे उद्दिष्ट म्हणून गांधीजींनी अहिंसक ग्रामीण अर्थव्यवस्था स्वीकारली.

ब) गांधीजींनी विश्वस्तत्व, आर्थिक क्रियाकलापांचे विकेंद्रीकरण, कामगार, सघन तंत्रज्ञान आणि दुर्बल घटकांना प्राधान्य देण्याचे समर्थन केले.

क) गांधीवादी अर्थशास्त्रानुसार, उत्पादन हे वैयक्तिक लालसेने नव्हे तर सामाजिक गरजेनुसार ठरवले जाते.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) फक्त क
४) वरीलपैकी सर्व

प्रश्न क्र. १५

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) बलवंत राय मेहता समितीच्या स्थापनेपासून भारतातील पंचायत राज संस्थांची उत्क्रांती सुरू झाली.

ब) समुदाय विकास कार्यक्रम (CDP) चे कामकाज पाहण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि तिने भारतात त्रिस्तरीय पंचायत राज प्रणाली सुचवली होती.

क) तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी नागौर जिल्ह्यात २ ऑक्टोबर १९५३ रोजी पहिल्या पंचायतचे उद्घाटन केले.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) फक्त क
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १६

चिपको आंदोलनासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे

अ) चिपको आंदोलन प्रामुख्याने वनसंवर्धनाची चळवळ आहे.

ब) झाडांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने 19६७ मध्ये याची सुरुवात झाली.

क) चिपको आंदोलनाला १९८७ मध्ये “भारतातील नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, जतन आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत वापर करण्याच्या वचनबद्धतेसाठी” राईट लिवलीहूड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि क
२) ब आणि क
३) फक्त ब
४) वरील सर्व

प्रश्न क्र. १७

खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा :

अ) काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील बसरूर येथे मायलरा पंथातील दोन शिल्पे आढळली, जी एक इ.स. १५व्या शतकातील आणि दुसरी १७व्या शतकातील आहे.

ब) मायलारा पंथाने जोपासलेली विश्वास प्रणाली तिच्या असामान्य विधी आणि विकसित पद्धतींमुळे विशिष्टता व्यक्त करते.

क) मायलारा पंथाची मुख्य देवता मैलारा, ही देवता शिवाचे एक रूप आहे.

पर्यायी उत्तरे :

१) अ आणि क
२) ब आणि अ
३) फक्क अ
४) वरील सर्व

वरील प्रश्नांची उत्तरं पुढील प्रमाणे :

प्रश्न क्र. १- २
प्रश्न क्र. २- २
प्रश्न क्र. ३- ४
प्रश्न क्र. ४- ३
प्रश्न क्र. ५- ४
प्रश्न क्र. ६- ३
प्रश्न क्र. ७- ४
प्रश्न क्र. ८- १
प्रश्न क्र. ९- ४
प्रश्न क्र. १०- २
प्रश्न क्र. ११- ३
प्रश्न क्र. १२- ३
प्रश्न क्र. १३- ३
प्रश्न क्र. १४- ४
प्रश्न क्र. १५- १
प्रश्न क्र. १६- ३
प्रश्न क्र. १७- ४

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह!यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc loksatta test series history polity evs ecomics geography question set 16 spb