scorecardresearch

एमपीएससी

Maharashtra Public Service Commission


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) या संस्थेची निर्मिती भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अंतर्गत करण्यात आली आहे. या महाराष्ट्र राज्यातील A आणि B गटातील नागरी सेवा अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम या संस्थेद्वारे केले जाते. दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससीच्या प्रवेश परीक्षेमध्ये सहभागी होत असतात. गुणवत्ता आणि नियम यांनुसार अर्ज करणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी योग्य उमेदवारांची निवड केली जाते. एमपीएसचे मुख्य कार्यालय महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये आहे.


महाराष्ट्र राज्याचे कामकाज सुरळीत आणि पूर्व क्षमतेने सुरु राहावे आणि भरतीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता राहावी अशी काही महत्त्वपूर्ण कामे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पूर्ण केली जातात. स्पर्धा परीक्षा, भरतीची प्रक्रिया, अधिकाऱ्यांची पदोन्नती, त्यांच्या बदल्या याशिवाय शिस्तभंग प्रकरणाच्या संदर्भातील निर्णय घेताना मदत करणे यांसारख्या गोष्टींची पूर्तता या संस्थेद्वारे केली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेची विभागणी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्तव चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्याक, दिवाणी न्यायाधीश यांसारख्या अनेक जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाते. वयवर्ष १९ वर्ष पूर्ण असलेल्या राज्याच्या सरकारी पदासाठी एमपीएससी परीक्षेद्वारे अर्ज करु शकते.


 


खुल्या वर्गातील उमेदवार वयवर्ष ३८ पर्यंत आणि राखीव वर्गातील उमेदवार वयवर्ष ४३ पर्यंत या स्पर्धा परीक्षांना बसू शकतात. ही परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येते. असे असले तरी, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती ही राज्याच्या राज्यपालाद्वारे केली जाते. किशोर राजे निंबाळकर हे या संस्थेचे प्रमुख आहेत.


Read More
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण

वनस्पती आणि प्राणिशास्त्रापैकी एकाबाबत वर्गीकरणाचा प्रश्न दरवर्षी समाविष्ट केलेला आहे. मूलभूत, पारंपरिक मुद्दे आणि त्यांचे उपयोजन अशा आयामांवर आधारीत प्रश्नांचा…

MPSC Verdict on confusion in Clerk Typist exam Nagpur
एमपीएससी: लिपिक-टंकलेखक परीक्षेतील गोंधळाबाबत मोठा निर्णय; ‘या’ उमेदवारांना कारवाईचा इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लिपिक-टंकलेखक परीक्षेचा घोळ अखेर संपला आहे.आयोगाने यासंदर्भात सविस्तर उत्तर सादर करत उमेदवारांना दिलासा दिला आहे.

Orphan Blind Mala Shankar Baba Papalkar Yanche Success in MPSC 
लहानपणी कचऱ्यात सापडलेल्‍या मुलीची गगनभरारी; अनाथ-अंध मालाचे एमपीएससीत यश

जन्मत:च अंध असलेल्या त्‍या चिमुकलीला तिच्या जन्मदात्यांनी जळगाव येथील रेल्वेस्‍थानकाच्या कचरा पेटीत टाकले.

MPSC, Maharashtra Public Service Commission, Police Sub Inspector, MPSC Announces psi Physical Test timetable, MPSC Announces psi Physical Test revised timetable, mpsc news, psi physical test news,
पीएसआय शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर… कधी, कुठे होणार चाचणी?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी जाहीर…

Maharashtra Public Service Commission, mpsc, mpsc Announces exam date, mpsc Announces exam timetable, mpsc exam 2024, Gazetted Civil Services Preliminary Examination, Fill 524 Vacant Posts,
राज्य लोकसेवा आयोगाची ६ जुलै रोजी परीक्षा, राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा( २०२४)…

article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- नागरिकशास्त्र

अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नागरिकशास्त्र घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत करण्यात आला…

Deputy Secretary Appointment, controller of examination , mpsc, Maharashtra Public Service Commission, Raises Questions on controller of examination post, civil services, competition exam,
‘एमपीएससी’च्या परीक्षा नियंत्रक पदाचा विषय पुन्हा चर्चेत, काय आहे प्रकरण? वाचा…

एमपीएससीच्या आकृतीबंधामध्ये परीक्षा नियंत्रक हे पद नाही. तरीही हे पद निर्माण करण्यात आले असून या पदाची जबाबदारी ज्यांच्या नियुक्तीची फाईल…

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – नागरिकशास्त्र प्रश्न विश्लेषण

मागील वर्षीपासून अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली.

mpsc exam marathi news, mpsc marathi news
एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांबाबत मोठी अपडेट, तारखा कधी जाहीर होणार? वाचा…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने पदभरती संदर्भात नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.

MPSC Mantra Non Gazetted Services Joint Prelims Exam Analysis of geography questions
MPSC मंत्र: अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा; भूगोल प्रश्न विश्लेषण

मागील वर्षीपासून अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली.

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण

पूर्व परीक्षेमध्ये मागील वर्षांत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे पाहू.

संबंधित बातम्या