मागील लेखातून आपण चंपारण आणि खेडा सत्याग्रह नेमका काय होता? तसेच त्याची वैशिष्ट्ये आणि परिणामांबाबत माहिती घेतली. या लेखातून अहमदाबाद सत्याग्रहाविषयी जाणून घेऊ या. अहमदाबाद सत्याग्रह हा भारतातील महात्मा गांधींच्या सत्याग्रहांपैकी दुसरा सत्याग्रह होता. हा सत्याग्रह अहमदाबाद गिरणी कामगार संप या नावानेही ओळखला जातो. अहमदाबादमधील गिरणी कामगार आणि गिरणी मालक यांच्यातील वादात हस्तक्षेप म्हणून गांधीजींनी अहमदाबाद सत्याग्रह केला. यावेळी त्यांनी उपोषणाचा एका शस्त्रासारखा वापर केला आणि यात त्यांना यशही मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – UPSC-MPSC : खेडा सत्याग्रहात महात्मा गांधींची भूमिका नेमकी काय होती? त्याचे परिणाम काय झाले?

पार्श्वभूमी आणि कारणे :

अहमदाबाद बॉम्बे प्रांतातील दुसरे मोठे आणि महत्त्वाचे शहर होते. १८१८ पर्यंत अहमदाबाद कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. बघता बघता अहमदाबाद हे औद्योगिक केंद्र म्हणून उदयास आले. मात्र, ऑगस्ट १९१७ दरम्यान अहमदाबादमध्ये प्लेगची साथ पसरली होती. त्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात शेकडो गिरणी कामगारांचाही समावेश होता. तसेच प्लेगच्या भीतीने अनेक कामगार अहमदाबाद सोडून दुसरीकडे स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे गिरणी मालकांपुढे कामगारांचा मोठा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर उपाय म्हणून गिरणी मालकांनी प्लेग बोनस देण्याची घोषणा केली.

दरम्यान, जानेवारी १९१८ मध्ये प्लेग पूर्णपणे संपुष्टात आला. त्यामुळे गिरणी मालकांनी प्लेग बोनस देणे बंद केले. त्यामुळे कामगार नाराज झाले. तसेच यावरून गिरणी मालक आणि कामगार यांच्यात संघर्ष सुरू झाला. कामगारांनी ५० टक्के महागाई भत्ता देण्याची मागणी केली. मात्र, गिरणी मालक केवळ २० टक्के महागाई भत्ता देण्यावर ठाम होते. यावरून काही कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे गिरणी मालकांनी बॉम्बे आणि इतर शहरांतून कामगारांना काम करण्यास बोलावले. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी अनुसुया साराभाई यांची भेट घेतली होती. अनुसुया साराभाई या अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या संघटनेचे अध्यक्ष अंबालाल साराभाई यांची बहीण व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी हा संपूर्ण विषय महात्मा गांधींच्या कानावर घातला.

अहमदाबाद सत्याग्रह नेमका काय होता? :

अनुसुया साराभाई यांच्या विनंतीनंतर गांधीजी थेट अहमदाबाद येथे पोहोचले. त्यांनी गिरणी कामगार आणि गिरणी मालक यांच्या वादात हस्तक्षेप केला. त्यांनी कामगारांना ३५ टक्के पगारवाढीची मागणी करावी आणि त्यासाठी संप करावा, असा सल्ला दिला. त्यानुसार शेकडो कामगार संपात सहभागी झाले. तसेच कामगारांच्या निश्चयाला बळ मिळावे, यासाठी त्यांनी प्राणांतिक उपोषणही केले. त्यांच्या या उपोषणाने गिरणी कामगारांवर दबाव आला. अखेर गिरणी कामगारांनी माघार घेत, चौथ्या दिवशी ३५ टक्के वेतनवाढीची मागणी मान्य केली.

हेही वाचा – UPSC-MPSC : चंपारण सत्याग्रह नेमका काय होता? त्याची वैशिष्ट्ये अन् परिणाम

खरे तर चंपारण व अहमदाबाद सत्याग्रह असो किंवा खेडा सत्याग्रह, या चळवळींमुळे गांधीजी हे जनसामान्यांच्या संपर्कात आले होते. तसेच ते एक राष्ट्रीय नेते म्हणूनही उदयास आले होते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history ahmedabad satyagraha its consequence and causes spb