WAPCOS Recruitment 2024: WAPCOS म्हणजेच वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हीसेस इंडिया अंतर्गत भरती मोहीम जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार wapcos.co.in. या अधिकृत बेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. मुलाखतीतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे या भरतीसाठी निवड केली जाईल. अर्ज करण्याची प्रक्रिया १५ एप्रिल पासून सुरु झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ एप्रिल असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

रिक्त पदे आणि पदसंख्या –

टीम लीडर, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, ज्युनियर लेव्हल सिव्हिल इंजिनियर व इतर पदांसाठी एकूण २७५ जागांसाठी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता –

उमेदवारांच्या पदानुसार शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत देण्यात आली आहे ती एकदा वाचून घ्यावी…

https://www.wapcos.co.in/careers.aspx

हेही वाचा…NPCIL Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरीची संधी! ४०० जागा, ५५ हजारांपर्यंत पगार; ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख

वयोमर्यादा –

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान १८ ते कमाल ५५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज कसा करावा?

  • सगळ्यात पहिला WAPCOS च्या अधिकृत वेबसाइटला https://www.wapcos.co.in/ भेट द्या.
  • होम पेजवर WAPCOS भरती २०२४ या लिंकवर क्लिक करा. सर्व आवश्यक माहिती कागदपत्रे अपलोड करून द्यावी.
  • अर्ज सबमिट करा.
  • तसेच संदर्भासाठी फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घेऊन ठेवा. अशाप्रकारे इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wapcos engineer recruitment or bharti for 275 various posts check selection process and important details asp
First published on: 18-04-2024 at 14:14 IST