पारंपरिक फोनबुकला पर्याय
ई-मेलची सुसंगत रचना
बहुतांश लोक ईमेल क्लायन्ट म्हणून जीमेलला पसंती देतात. जास्त स्टोअरेज क्षमता आणि हाताळण्यास सहज सोपे असल्याने जीमेलकडेच वापरकर्त्यांचा ओढा असतो. अँड्रॉइड फोनमुळे जीमेलचे महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र, जीमेलवरील पसारा इतका वाढला आहे की इनबॉक्समध्ये दररोज ईमेलचा पाऊस पडत असतो. यातील अनेक ईमेल जाहिराती किंवा सवलतींच्या ऑफर देणाऱ्या कंपन्यांचे असतात. अशा ईमेलचा भडिमार इतका होतो की हे पाहताना एखादा महत्त्वाचा ईमेल नजरेतून सुटून ‘डिलीट’ होण्याची शक्यता असते. जास्त जाहिराती आणि उत्पन्न यांच्या हव्यासापोटी जीमेलची ही अवस्था करणाऱ्या गुगलनेच यावर पर्याय शोधला आहे. गुगलने ‘इनबॉक्स’ हे अॅप आणले असून या अॅपच्या माध्यमातून आपल्याला येणारे ईमेल सहज आणि जलद हाताळता येतात. वापरण्यास अतिशय सोपे असलेले हे अॅप इंटरनेट डेटाचाही कमी वापर करते. या अॅपचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक वेळी नवीन ईमेल तपासण्यासाठी तो खुला करण्याची गरज भासत नाही. इनबॉक्सच्या स्क्रीनवर मेसेजसोबतच त्यातील मजकूर समजू शकतो. हे अॅप एकाच प्रकारच्या ईमेलचे ‘बंडल’ तयार करते. त्यामुळे विशिष्ट प्रकारातील ईमेल तपासायचे असल्यास तातडीने ते पाहता येतात. हे अॅप जीमेलवर अतिशय उत्तमपणे काम करते.
असिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com