उडीद डाळ आणि काळे उडीद पचायला थोडे जड, पण त्यात शरीराला आवश्यक असणारी कबरेदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने योग्य प्रमाणात आहेत. उडीद डाळीच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते, स्टॅमिना वाढतो. उडीद डाळीत कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्व ब ६ आणि मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम यांचे प्रमाण उत्तम आहे.
उडीद डाळीच्या पिठाचे पोटीस सुजलेल्या सांध्यांवर लावल्यास आराम पडतो. उडीद डाळ भिजवून वाटून फुगवल्यानंतर त्यात तयार होणारे बॅक्टेरिआ आणि यीस्ट शरीराला आरोग्यदायी ठरतात. असे पदार्थ मेंदूसाठी खुराक ठरतात. इडली, डोसा, मेदूवडय़ासारखे चविष्ट प्रकार उडदापासून बनवले जातात.
उडीद डाळीची अळुवडी
१ वाटी उडीद डाळ ४-५ तास भिजत घालावी आणि १ चमचा आल्याचे तुकडे, १ चमचा जिरं, ५-६ हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी खोबऱ्याबरोबर वाटून घ्यावी. वाटलेली डाळ फुगण्यासाठी ३-४ तास ठेवावी. मग त्यात मीठ, १ मोठा चमचा चिंचेचा कोळ, प्रत्येकी पाव चमचा मिरी पावडर, हिंग, पाव वाटी तीळ मिसळावे. अळूच्या १०-१२ पानांच्या मागच्या बाजूला हे मिश्रण लावून उंडे तयार करावेत आणि कुकरमध्ये उकडून घ्यावे. उंडे गार झाल्यावर त्याचे काप करून ते तळावे किंवा तेल घालून परतावे.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2015 रोजी प्रकाशित
उडीद डाळ
उडीद डाळ आणि काळे उडीद पचायला थोडे जड, पण त्यात शरीराला आवश्यक असणारी कबरेदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने योग्य प्रमाणात आहेत.

First published on: 09-05-2015 at 02:31 IST
मराठीतील सर्व अन्नसंकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black gram