X
X

पाकिस्तानातील अमेरिकी दूतावासावर हल्ल्याची शक्यता

READ IN APP

अमेरिकी नागरिकांनी ख्रिसमस व नववर्षदिनी काळजी घ्यावी असे सांगण्यात आले.

पाकिस्तानातील अमेरिकी दूतावासावर ख्रिसमस व नववर्षदिनी हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यात मशिदी, दुकाने व इतर गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते, असे दूतावासानेच म्हटले.

अमेरिकेच्या पाकिस्तानातील दूतावासाला धमक्यांची माहिती मिळाली असून इस्लामाबाद येथे डिसेंबरमध्ये ख्रिसमस व नवीन वर्षदिनाच्या वेळी हल्ले केले जाण्याची शक्यता त्यानुसार वर्तवली आहे.

या हल्ल्यांमध्ये मशिदी व शॉपिंग सेंटर्स ही लक्ष्य ठरतील तसेच गेल्या आठवडय़ात अमेरिकी नागरिकांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेस्टॉरंट, हॉटेल्स, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणे येथे हे हल्ले होऊ शकतात. त्यामुळे अमेरिकी नागरिकांनी ख्रिसमस व नववर्षदिनी काळजी घ्यावी असे सांगण्यात आले. यापूर्वी २८ ऑगस्टला अमेरिकेने पाकिस्तानमध्ये प्रवास करणे धोक्याचे आहे असा इशारा दिला होता.

24
X