आनंदाची बातमी! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल; तीन दिवस आधीच आगमन

तीन दिवस आधीच केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे.

monsoon weather rain
प्रातिनिधीक फोटो

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात आगमन केल्यानंतर काही दिवस विश्रांती घेतली. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमध्ये दोन दिवस काहीच प्रगती झाली नव्हती. त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संथगतीनं आगेकूच केली. दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये आगमन करेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पण तीन दिवस आधीच केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे.

केरळमध्ये मान्सूनने आगमन केल्यानंतर हवामान खात्याने आता दक्षिणेकडील काही राज्यांत पावसाचा इशारा दिला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरवर्षी केरळमध्ये १ जूनला मान्सूनचं आगमन होतं. पण यंदा तीन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील मार्गक्रमणासाठी सध्या पोषक हवामान तयार झालं आहे. येत्या काही दिवसांत मध्य अरबी समुद्र, केरळातील उर्वरित भाग, तामिळनाडू, कर्नाटक आणि दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरात देखील मान्सूनचं आगमन होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसात ईशान्य भारतातील काही राज्यात देखील मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान दक्षिणेकडील काही राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 3 days before monsoon arrived in kerala imd give alert in south states monsoon latest update rmm

Next Story
२२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान नेपाळमध्ये बेपत्ता; ४ भारतीय नागरिकांचा समावेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी