आसपासच्या हवामानाचा अंदाज (Weather Forecast) लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांना सुपरकंप्यूटर्स असे म्हटले जाते. हवामानाशी संबंधित माहितीचे आकलन करणे, ती माहिती संग्रहित करणे आणि त्यावर तर्क काढणे ही कामे हवामान विभाग करत असतं.
भारतामध्ये १८७५ मध्ये हवामान विभागाची स्थापना करण्यात आली. याचे प्रमुख कार्यालय दिल्लीमध्ये असून मुंबई, चैन्नई. कोलकाता, नागपूर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये त्यांची केंद्रे उभारण्यात आली. हवामानाचा अंदाजानुसार सर्वकाही ठरत असते. त्यामुळे ही यंत्रणा खूप आवश्यक आहे असे मानले जाते. पर्जन्यमान, उष्णतेचे प्रमाण किंवा अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती यांची माहिती सर्वप्रथम हवामान खात्याकडून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते.
पूर्वी प्रामुख्याने बॅरोमेट्रिक प्रेशर, सध्याचे हवामान आणि आकाशातील स्थिती किंवा ढगांतील बदल यावर आधारित समीकरण सोडवून हवामानाचा अंदाज लावला जायचा. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. तसेच संगणक अनेक वातावरणीय घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन अधिक चांगला अंदाज लावतात.Read More
राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमूसळधार तर काही जिल्ह्यांना मुसळधार…