गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून भारतासह संपूर्ण जगभरात करोना विषाणूनं थैमान घातलं घातलं. अनेक महिने निर्बंध सहन केल्यानंतर जगाने आता मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यानच्या काळात जगभरातील व्यापार आणि उद्योग बंद पडले. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले. असं एकंदरीत वातावरण असताना, करोनामुळे भारतात डिजिटल पेमेंटला मात्र ‘अच्छे दिन’ आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२१ मध्ये भारतात तब्बल ४८ अब्ज रिअल टाइम ट्रान्झेक्शन्स (Real Time Transaction) झाले आहेत. हा आकडा आपल्या शेजारील चीनसारख्या बलाढ्य देशाच्या तुलनेत जवळपास तीनपट अधिक आहे. २०२१ मध्ये चीनमध्ये १८ अब्ज रिअल टाइम ट्रान्झेक्शन्स झाले आहेत. एसीआय वर्ल्डवाइडने दिलेल्या अहवालानुसार, भारताचा हा आकडा अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या सर्व देशात झालेल्या रिअल टाइम ट्रान्झेक्शन्सच्या तुलनेत साडेसहापट अधिक आहे.

इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात यूपीआय (UPI) अधारित मोबाइल पेमेंट अ‍ॅप्स (Mobile payments apps)आणि क्यूआर कोड (QR code) वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. ग्राहक आणि विक्रेत्यांकडून जास्तीत जास्त डिजिटल व्यवहार (Digital Payment) केले जात आहेत. करोना महामारीमुळेच रिअल टाइम ट्रान्झेक्शन्समध्ये वाढ झाल्याचं एसीआय वर्ल्डवाइडच्या अहवालात म्हटलं आहे. २०२१ मध्ये भारतात झालेल्या सर्व व्यवहाराच्या तुलनेत ३१.३ टक्के व्यवहार हे डिजिटल पेमेंटद्वारे करण्यात आले आहेत. ग्राहक सध्या मोबाइलवर अधारित रिअल टाइम ट्रान्झेक्शन्स (Mobile based payments) वापरण्याला जास्तीत जास्त महत्त्व देत आहे. तर इतर पारंपरिक आणि रोकडमधून व्यवहार करण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहेत.

असाच कल कायम राहिला, तर २०२६ पर्यंत जगात रिअल टाइम ट्रान्झेक्शन्स करण्यामध्ये भारताचा वाटा तब्बल ७० टक्के इतका असू शकतो. सेंटर फॉर इकोनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चनुसार, भारतात २०२१ मध्ये झालेल्या रिअल टाइम ट्रान्झेक्शन्समुळे ग्राहक आणि व्यावसायिकांची तब्बल १२.६ अब्ज डॉलरची बचत झाली आहे. हा आकडा भारतीय जीडीपीच्या (GDP) ०.५६ टक्के इतका असून जळपास २५ लाख लोकांनी काम केल्याप्रमाणे आहे, अशी माहिती एसीआय वर्ल्डवाइचे अंकुर सक्सेना यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 48 billion real time transaction in india during 2021 three times more than china rmm