Five Died In Well : झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. हजारीबागच्या चर्ही गावात पत्नीशी वाद झाल्यानंतर एकाने जीव देण्यासाठी विहिरीत उडी मारली होती. त्याला वाचवण्यासाठी आणखी चौघांनी विहिरीत उडी घेतली. पण, दुर्दैवाने यामध्ये पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील चर्ही गावात एका तरुणाने पत्नी रुपादेवीशी वाद झाल्याने त्याच्या दुचाकीसह रागाच्या भरात विहिरीत उडी मारली होती. त्याला वाचवण्यासाठी आणखी चौघांनी विहिरीत उडी घेतली. पण दुर्दैवाने यामध्ये पाचही जणांचा मृत्यू झाला,” अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बीएन प्रसाद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे.

सर्व मृतांचे वय २५ ते २८ दरम्यान

या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या इतर चौघांची नावे राहुल करमाळी, विनय करमाळी, पंकज करमाळी आणि सूरज भुईया अशी आहेत. या सर्वांचे वय २५ ते २८ दरम्यान होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकारानंतर संबंधित विहीर झाकण्यात आली असून, त्याजवळील हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा : Tesla Cybertruck Explodes Video : अमेरिकेतील लास वेगासमध्ये ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर टेस्ला सायबर ट्रकचा स्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी

विषारी वायूमुळे मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज

दरम्यान या घटनेबाबत बोलताना चर्ही पोलीस ठाण्याचे प्रभारी गौतम कुमार यांनी पीडितांचा मृत्यू विषारी वायूमुळे झाला असावा, अशी शंका व्यक्त केली आहे. दुचाकीतील पेट्रोल विहिरीतील पाण्यात मिसळल्यामुळे विषारी वायू तयार झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या पाचही जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चर्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा : New Orleans Attack : अमेरिका हल्ल्यातील संशयित ISIS प्रेरित? लष्करातील सेवा ते कुटुंबाला मारण्याचा डाव, व्हिडिओतून काय आलं समोर?

घरगुती वादांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले

अलिकडेच घरगुती वादामुळे बंगळुरूतील तंत्रज्ञ अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली होती. हे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांनी मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांची पत्नी, सासू आणि मेहुण्याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर गेल्या महिनाभरात घरगुती वादामुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 people die in well after domestic dispute jharkhand aam