Air India Express flight to Varanasi received a bomb threat indigo gets security threat for 5 airports : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात कारमध्ये स्फोट झाल्याच्या घटनेनंतर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. यादरम्यान बुधवारी वाराणसी येथे जात असलेल्या एका एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान यानंतर विमान कंपनीने तात्काळ सरकारन नियुक्त बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटीला याबद्दल माहिती दिली.

“आमच्या एका वाराणसीला जाणाऱ्या विमानाला एक सुरक्षाविषयक धमकी मिळाली. प्रोटोकॉलनुसार संबंधित यंत्रणेला तात्काळ सतर्क करण्यात आले, आणि सर्व आवश्यक सुरक्षा प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात आल्या,” असे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले.

“विमान सुरक्षितपणे उतरले, आणि सर्व प्रवासी खाली उतरवण्यात आले आहे. सर्व अनिवार्य असणाऱ्या सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान ऑपरेशन्ससाठी दिले जाईल,” असे निवेदनाक पुढे सांगण्यात आले आहे.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार पाच मोठ्या विमानतळांवर देखील सुरक्षेशी संबंधित समस्या उद्भवल्या, यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि तिरुअनन्तपुरम या विमानतळांचा समावेश आहे. या विमानतळांना देण्यात आलेल्या धमक्या या डिजीटल स्वरूपात देण्यात आल्या होत्या.

सूत्रांनी सांगितले की, ईमेलऐवजी पर्यायी डिजिटल पद्धतींचा वापर करून धमकी दिली गेली, ज्याबद्दल आज दुपारी माहिती समोर आली.

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर देशभरात सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ही धमी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या प्रशासनाकडून विमानतळ, रेल्वे स्टेशन्स आणि मेट्रो सेवा येथे कडक सुरक्षाव्यवस्था ठेवली जात आहे. दिल्लीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार स्फोटानंतर राष्ट्रीय राजधानी आणि इतरही अनेक ठिकाणी पाठत ठेवली जात आहे.

जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये केलेल्या कारवाईत पोलिसांनी २९०० किलोग्रॅम स्फोटके जप्त केली आहेक. अधिकाऱ्यांनी या नेटवर्कला ‘व्हाईट-कॉलर टेरर मॉड्यूल’ असे म्हटले असून, ते जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गझवत-उल-हिंद (Ansar Ghazwat-ul-Hind) या दहशतवादी गटांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे