भारतातली १० सर्वोत्कृष्ट आणि १० वाईट शहरं कुठली? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आम्ही देऊ शकतो. पावसाळ्याचे महिने संपले आहेत. त्यामुळे हवा स्वच्छ झाली आहे. मात्र अनेक शहरी भागांमध्ये वातावरणातील हवेची पातळी पुन्हा घसरते आहे. ऑक्टोबर हिट सुरु झाला आहे. त्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात AQI ने देशातल्या १० स्वच्छ आणि १० वाईट शहरांची यादी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीची हवा सर्वाधिक प्रदुषित

२२ ऑक्टोबर या दिवशी सर्वात वाईट हवा किंवा ज्याला प्रदूषण सर्वाधिक प्रमाणात असलेलं देशातलं शहर म्हणजे दिल्ली आहे. Very Poor असा दर्जा AQI ने दिल्लीला दिला आहे. दिल्लीतल्या २७ ठिकाणी प्रदूषणाचा अंदाज घेतल्यानंतर हे शहर रेड झोनमध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा मुद्दा उपस्थित केला आहे.

हवेतील प्रदूषण हे सर्वात घातक प्रदूषण

हवेतील प्रदूषण हे वातावरणातील सर्वाधिक घातक प्रदूषण आहे. कारण ते माणसाच्या श्वासावर म्हणजेच त्याच्या जगण्यावर थेट परिणाम करतं. WHO ने दिलेल्या माहितीनुसार जगभरात ९ पैकी एक मृत्यू प्रदूषणाच्या कारणामुळे होतो. तर प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी सुमारे ७० लाख मृत्यू अकाली होतात. एवढंच नाही तर प्रदूषणामुळे दमा, कर्करोग, फुफ्फुसांचे विकार या समस्याही लोकांना जाणवू लागतात किंवा याच्याशी संबंधित आजारही जडतात. तसंच लहान मुलांच्या मानसिक अवस्थेवरही याचा परिणाम होऊ शकतो. २०२३ मध्ये भारत प्रदूषणाच्याबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर होता. आता AQI ने १० भारतीय प्रदुषित हवा असलेल्या शहरांची आणि १० उत्तम हवा असलेल्या शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. इंडियन एक्स्रपेसने हे वृत्त दिलं आहे.

कोणती दहा शहरं सर्वाधिक प्रदूषण असणारी आहेत?

१) दिल्ली हवेचा दर्जा AQI प्रमाणे अत्यंत वाईट
२) सिंगुर्ली (मध्य प्रदेश) हवेचा दर्जा AQI प्रमाणे वाईट
३) भिवानी (हरियाणा) हवेचा दर्जा AQI प्रमाणे वाईट
४) रोहतक (हरियाणा) हवेचा दर्जा AQI प्रमाणे वाईट
५) जिंद (हरियाणा) हवेचा दर्जा AQI प्रमाणे वाईट
६) बहादुरगड (हरियाणा) हवेचा दर्जा AQI प्रमाणे वाईट
७) गाझियाबाद (उत्तर प्रदेश) हवेचा दर्जा AQI प्रमाणे वाईट
८) नोएडा (उत्तर प्रदेश) हवेचा दर्जा AQI प्रमाणे वाईट
९) कैथल (हरियाणा) हवेचा दर्जा AQI प्रमाणे-वाईट
१०) हाजिपूर (बिहार) हवेचा दर्जा AQI प्रमाणे वाईट

केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने ही यादी जाहीर केली आहे. दिल्लीतलं प्रदूषणाचं प्रमाण हे काळजीत पाडणारं आहे. तसंच हवा प्रदूषण कमी असलेल्या किंवा उत्कृष्ट हवामान असलेल्या देशातल्या १० शहरांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

सर्वोत्कृष्ट हवामान असलेली १० शहरं

१) मदुराई (तामिळनाडू) हवेचा दर्जा AQI प्रमाणे -चांगला
२) चिक्कबल्लारपूर (कर्नाटक) हवेचा दर्जा AQI प्रमाणे -चांगला
३) उटी (तामिळनाडू) हवेचा दर्जा AQI प्रमाणे -चांगला
४) मदईकेरी (कर्नाटक) हवेचा दर्जा AQI प्रमाणे -चांगला
५) गदग ( कर्नाटक ) हवेचा दर्जा AQI प्रमाणे -चांगला
६) कलबुर्गी (कर्नाटक) हवेचा दर्जा AQI प्रमाणे -चांगला
७) पलकलाइपेरुर (तामिळनाडू) हवेचा दर्जा AQI प्रमाणे -चांगला
८) नागाव (आसाम) हवेचा दर्जा AQI प्रमाणे -चांगला
९) बेळगाव (कर्नाटक) हवेचा दर्जा AQI प्रमाणे -चांगला
१०) उडुपी (कर्नाटक) हवेचा दर्जा AQI प्रमाणे -चांगला

हवेचा दर्जा चांगला असलेल्या या दहा शहरांची नावंही प्रदूषण नियामक मंडळाने जाहीर केली आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air quality index 2024 top 10 indian cities with best and worst air quality scj