वायएसआर काँग्रेस, तेलगू देसम पार्टी या पक्षांसह इतर विरोधी पक्षांनी आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुरुवारी आंध्र प्रदेश बंद पुकारला. तसेच राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन सुरु केले आहे.
Vizag: Visuals of state wide 'bandh' and national highways blockade called by opposition parties demanding special status for #AndhraPradesh. pic.twitter.com/2ha6fvrvXc
— ANI (@ANI) March 22, 2018
वायएसआर आणि टीडीपीने विजयवाडासहित राज्याच्या अनेक भागातील महामार्ग रोखून धरले आहेत. यामुळे वाहतुक व्यवस्था कोलमडली. दरम्यान, टीडीपीच्या खासदारांनी दिल्लीत संसद भवन परिसरात आंध्रप्रदेशच्या विशेष राज्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन केले.
Delhi: Telugu Desam Party (TDP) MPs hold protest in Parliament premises demanding special status for #AndhraPradesh pic.twitter.com/BTQR8opwas
— ANI (@ANI) March 22, 2018
‘एनडीए सदस्य या नात्याने भाजपा आपल्या राज्याला न्याय देईल अशी अपेक्षा होती, मात्र काहीच झालं नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याची घोषणा केली होती.
आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्यावा, अशी ‘तेलगू देसम’ची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने चंद्राबाबू नायडू आक्रमक झाले आहेत. निषेधाचे पहिले पाऊल म्हणून टीडीपीचे दोन्ही केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांनी आठवड्याभरापूर्वी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण अनेकदा स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते दुरध्वनीवर आले नाही, असा आरोपही नायडूंनी केला होता.