जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये बुधवारी सकाळी भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. जवानाचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बारामुल्ला जिल्ह्यातील राफियाबाद भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यामुळ बुधवारी सकाळी या भागात शोधमोहिम सुरू करण्यात आली. जवानांना पाहताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्या सुरुवात केली. यावेळी जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. गोळीबाराच्या धुमश्चक्रीत लष्कराचा एक जवान शहीद झाला, अशी माहिती पोलीसांनी दिली.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करे इस्लाम या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी या भागात लपून बसले होते. त्यापैकी एकाचे नाव इम्तियाझ अहमद कांदू असे आहे. यापूर्वी सहा लोकांच्या हत्येमुळे त्याला शोधून देणाऱय़ाला दहा लाखांचे बक्षिस या अगोदरच जाहीर करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army jawan killed in gun battle with militants in baramulla