पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला असून या गोळीबारात ते जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाच कर्णधार बाबर आझमने या हल्ल्याचा निषेध केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर त्याने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Firing at Imran Khans Rally : गोळीबारात जखमी झाल्यानंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

काय म्हणाला बाबर आझम?

“इम्रान खान यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध. अल्लाह त्यांना सुरक्षित ठेवो आणि आमच्या पाकिस्तानचे रक्षण करो”, अशी प्रतिक्रिया बाबर आझमने दिली आहे.

हेही वाचा – Firing at Imran Khan’s Rally : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने तातडीने निवडणूक घेण्याची मागणी करत लाहोर ते इस्लामाबाद ‘हकीकी आझादी मार्च’ नावाने महामोर्चा काढला असून पक्षाचे हजारो कार्यकर्ते खान यांच्यासह इस्लामाबादकडे निघाले होते. दरम्यान, आज हा मोर्चा वजिराबाद शहरात पोहचला असता या रॅलीवर गोळीबार झाला. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली आहे, अन्य चार जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.