आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना ब्रिटनची प्रवासविषयक कागदपत्रे मिळवून देण्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचा वाद निर्माण करण्यामागे पक्षातील नेत्याचाच हात असल्याचे ट्विट करून भाजप खासदार किर्ती आझाद यांनी या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. पक्षातील नेता आणि एका ख्यातनाम पत्रकाराने सुषमा स्वराज यांच्याविरोधात कट रचल्याचा आरोप किर्ती आझाद यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. आझाद यांच्या ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सुषमा स्वराज वादाच्या भोवऱ्यात
आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील कथित सट्टेबाजीच्या घोटाळ्यात अडकलेले आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना ब्रिटनची प्रवासविषयक कागदपत्रे मिळवून देण्यात मदत केल्यामुळे सुषमा स्वराज वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी केंद्र सरकार व भाजपने मात्र स्वराज यांची जोरदार पाठराखण केली. परंतु, आझाद यांच्या ट्विटमुळे आता भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader conspire against sushma swaraj says kirti azad