scorecardresearch

सुषमा स्वराज

अमोघ वक्तृत्व, प्रभावी संसदपटू, कुशल प्रशासक म्हणून सुषमा स्वराज यांनी भारतीय जनतेच्या मनावर राज्य केले. सुषमा स्वराज यांचा जन्म हरियाणाच्या अंबाला येथे १४ फेब्रुवारी १९५२ मध्ये झाला. १९७० मध्ये त्यांनी अभाविप या संघटनेच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. कायद्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९७३ साली सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरु केली. १९७५ साली स्वराज कौशल यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. स्वराज कौशल हे देखील सर्वोच्च न्यायालयात वकील होते. सुषमा स्वराज यांची राजकीय कारकिर्द अतिशय संघर्षशील आणि थक्क करणारी आहे. १९७७ मध्ये त्या पहिल्यांदा हरियाणाच्या विधानसभेत गेल्या. २५ व्या वर्षी कॅबिनेट मंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. ८० च्या दशकात भाजपात सामील झाल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १९९० साली त्या राज्यसभेच्या सदस्या झाल्या. १९९६ साली अटलबिहारी वाजपेयींच्या १३ दिवसांच्या सरकारमध्ये त्या माहिती व प्रसारण मंत्री होत्या. याच काळात त्यांनी लोकसभा व राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. १९९८ मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. १९९९ मध्ये त्यांनी कर्नाटकातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली, मात्र त्या पराभूत झाल्या. २००९ साली त्या मध्य प्रदेशमधील विदिशा मतदारसंघातून लोकसभेवर गेल्या. यावेळी लोकसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१४ साली विदिशा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती झाली. परराष्ट्र खात्याच्या कामाला त्यांनी तंत्रज्ञानाची जोड देत ट्विटरच्या माध्यमातून या खात्याचे प्रभावी असे कामकाज केले. ज्याची आजही आठवण काढली जाते. असंख्य लोकांच्या समस्या त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सोडवल्या. ६ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे निधन झाले.Read More

सुषमा स्वराज News

mike pompeo claims sushma swaraj
सुषमा स्वराज यांचा एक फोन आणि पाकिस्तानचा भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचा प्लॅन फसला; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचा खळबळजनक दावा

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांच्या पुस्तकात सुषमा स्वराज यांच्या चाणाक्षवृत्तीचा दाखला देणाऱ्या प्रसंगाचे वर्णन आहे. ज्यामुळे भारत-पाक अणुयुद्ध टळले…

संयुक्त राष्ट्रातील सुषमा स्वराज यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार भाषण केले. दहशतवादाच्या मुद्यावरुन त्यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला पूर्णपणे उघडे…

सुषमा स्वराज घेणार पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट

न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार आहेत.

फरार NRI नवऱ्यांविरोधात परराष्ट्र मंत्रालय लवकरच सुरु करणार वेबसाईट

लग्न करुन फरार झालेल्या एनआरआय नवऱ्यांविरोधात समन्स आणि वॉरंट बजावण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयात एक खास वेबसाईट बनवणार आहे.

आगामी निवडणुकीनंतर सुषमा स्वराज, राजनाथ सिंह भाजपाच्या मार्गदर्शक मंडळात: यशवंत सिन्हा

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा २०१४ सारख्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकणार नसल्याची भविष्यवाणी यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

एव्हरेस्टवर १५ भारतीय अडकले, सुषमा स्वराज यांना मागितली मदत

ट्विट पाहिल्यानंतर सुषमा स्वराज यांनी नेपाळमधील भारताचे राजदूत मनजीवसिंग पुरी यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केली आहे.

sushma swaraj, bjp, gujarat,
नरेश अग्रवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच वाद सुरु, सुषमा स्वराजांनी व्यक्त केली नाराजी

नरेश अग्रवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच वादाला सुरुवात झाली आहे.

भारताने अभियंते, शास्त्रज्ञ घडवले; पाकिस्तानने दहशतवादी आणि जिहादी घडवले-सुषमा स्वराज

भारताची लढाई गरीबीच्या विरोधात आहे, पाकिस्तान आमच्याशी भांडतोय

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या