Burari Building Collapsed Survivor Story : दिल्लीतील बुराडीमध्ये चार मजली निर्माणाधीन इमारत कोसळल्याची दुर्घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २० जण अडकले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एनडीआरएफची बचाव पथकं, अग्निशमन दलाची पथकं, स्वयंसेवी तरुणांची पथकं व पोलिसांनी तीन दिवस घटनास्थळी बचाव मोहीम राबवली. या बचाव पथकांनी पहिल्या टप्प्यात आठ जणांना सुखरूप बाहेर काढलं. दरम्यान, ३० जानेवारी रोजी मध्यरात्री आणखी एका कुटुंबाची सुटका करण्यात बचाव पथकांना यश मिळालं आहे. हे कुटुंब तब्बल ३० तास इमारतीच्या मलब्याखाली अडकलं होतं. या कुटुंबातील चारही सदस्य केवळ तीन टोमॅटो खाऊन ३० तास मलब्याखाली तग धरून होते. बचाव पथकांनी ३० तासांच्या बचाव मोहीमेनंतर राजेश (३०), त्यांची पत्नी गंगोत्री (२६), मुलगा प्रिन्स (६), धाकटा मुलगा ऋतिक (३) या चौघांना मलब्याखालून सुखरूप बाहेर काढलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दुर्घटनेतून सुखरूप बचावल्यानंतर राजेश यांनी बचाव पथकांचे आभार मानले. तसेच त्यांनी सांगितलं की “मी व माझ्या कुटुंतील सदस्यांनी केवळ तीन टोमॅटो खाऊन आमची भूक भागवली. तीन टोमॅटोंवर आम्ही ३० तास काढले”.

राजेश म्हणाले, “संध्याकाळी ६.३० च्या सुमारास इमारत कोसळली. मी व माझी बायको मिळून संध्याकाळचं जेवण बनवत असतानाच ही दुर्घटना घडली. आम्ही आमच्या अंगावरील मातीचा ढिगारा हटवण्यासाठी खूप प्रयत्न केल. परंतु, आम्हाला यश मिळालं नाही. मी हार मानली होती. मी सगळं काही ईश्वरावर सोडून दिलं होतं. जिथे आम्ही अडकलो होतो तिथे आमच्याजवळ केवळ तीन टोमॅटो होते. आम्ही हे तीन टोमॅटो खाऊन तीस तास तग धरला. बचाव पथकांनी आम्हाला बाहेर काढलं तेव्हा आम्ही बेशुद्ध होतो. आम्हाला कधी बाहेर काढलं, रुग्णालयात कधी व कसं नेलं हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला थेट रुग्णालयात उपचारांनंतर शुद्ध आली”.

“तीन टोमॅटो खाऊन ३० तास काढले”

बुराडीमध्ये एका इमारतीचं काम चालू होतं. हे काम चालू असतानाच इमारत कोसळली. त्यामुळे ढिगाऱ्याखाली २० जण अडकले होते. यामध्ये मजुरांची संख्या जास्त होती. बुराडीमधील कौशिक एन्क्लेव्ह परिसरातील ऑस्कर पब्लिक स्कूलजवळ ही दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकं ३६ तासांहून अधिक वेळ प्रयत्न करत होते. त्यांनी १५ हून अधिक लोकांना वाचवलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Burari building collapsed family of 4 trapped under debris survived 30 hours on 3 tomatoes asc