पीटीआय, नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कामगार-शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी देशातील १० प्रमुख कामगार संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय बंदला बुधवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला.
सार्वजनिक कंपन्या व उपक्रमांचे खासगीकरण, चार नव्या कामगार संहिता यांच्यासह विविध धोरणांविरोधात हा बंद पुकारण्यात आला. बिहार, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा येथे विविध संघटना संपामध्ये सहभागी झाल्या. विशेषत: विरोधी पक्षांनी या संपाला पाठिंबा दिला.
राजधानी दिल्लीमध्ये मात्र व्यापाऱ्यांनी संपाकडे पाठ फिरवली. दिल्लीतील सर्व ७०० बाजारपेठा, ५६ औद्याोगिक क्षेत्रे कार्यरत होती, असे ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने सांगितले.