अमेरिकेतल्या कोलोराडो या ठिकाणी यहुदी समुदायाच्या एका कार्यक्रमा दरम्यान मोठा हल्ला करण्यात आला. स्थानिकांचं म्हणणं आहे की संशयिताने आंदोलकांना पेटवण्याचा प्रयत्न केला. FBI चे संचालक काश पटेल यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यामागे नेमका काय उद्देश होता ते आत्ता सांगणं थोडं घाईचं ठरेल असंही पोलिसांचं म्हणणं आहे.

FBI संचालक काश पटेल यांनी काय म्हटलंय?

FBI चे संचालक काश पटेल म्हणाले की हा एक दहशतवादी हल्ला होता. दरम्यान चीफ रेडफियरनने म्हटलं आहे की पोलीस अद्याप या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणत नाहीयेत. रविवारच्या डाऊनटाऊन मध्ये पर्ल स्ट्रीट या ठिकाणी एक निवांत दुपार होती, त्यावेळी अचानक हा हल्ला झाला. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मी तुम्हाला हे आवाहन करतो की जे पीडित आहेत त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार करा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे सहा ते सात लोक आगीमध्ये होरपळले आहेत. या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या ठिकाणी पायी चालण्यास मज्जाव केला. हल्ल्यानंतर या ठिकाणी काळ तणावपूर्ण वातावरण होतं. श्वान पथक आणून या ठिकाणी तपास करण्यात आला अशीही माहिती पोलिसांनी दिली.

अमेरिकेत का तणाव वाढला आहे?

इस्रायल आणि हमास यांच्यातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतही तणाव वाढला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार इस्रायल समर्थक आणि पॅलेस्टाईनचे समर्थक यांच्यात यहुदी विरोधी घृणा आणि वाद विवाद वाढले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसह इस्रायलच्या समर्थकांनी पॅलेस्टाईनी समर्थकांना यहुदींच्या विरोधातले लोक असं म्हटलं आहे.