Congress leader digvijaya singh praises amruta fadnavis for bhajan : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेले ‘कोई बोले राम-राम, कोई खुदा…’ हे भजन नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी या गाण्याचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे. दिग्विजय सिंह यांनी अमृता फडणीस यांची पोस्ट पुन्हा शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अमृता फडणवीस या नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांचे लाईफस्टाइल, गायन आणि मॉडलिंगशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. नुकतेच अमृता फडणवीस यांचे नवीन भजन ‘कोई बोले राम-राम, कोई खुदा…’ टी-सीरीजच्या यू-ट्यूब चॅनलवर रिलीज झाले आहे. २४ ऑक्टोबर रोजी रिलीज झालेले हे भजन आतापर्यंत ४७ लाख ८५ हजाराहून अधिक लोकांनी ऐकले आहे.

हे भजन ऐकून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, “धन्यवाद अमृता फडणवीसजी, आपल्या मुखातून गुरु नानाकजी यांचे शब्दांवर गायलेले ‘शबद’ ऐकले. खूप छान वाटलं.”

शिवरात्रीच्या निमित्तानेही रिलीज केलं होतं एक भजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेले हे काही पहिले भजन नाही. यापूर्वी त्यांनी महाशिवरात्री निमित्त त्यांनी स्वत: लिहिलेले भजन देवाधिदेव तू महादेव रिलीज केले होते. हे भजन प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले होते, तर अमृता फडणवीस यांनी यामध्ये अभिनय केला होता.