तेलंगणातील कामारेड्डी येथे आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न काँग्रेस समर्थकांनी केला. मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर,या घटनेनंतर भाजपा समर्थकांनी अर्थमंत्र्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करून घोषणाबाजी करणाऱ्यांना बाजूला करत मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज सकाळी कामारेड्डी जिल्ह्यातील बांसवाडा येथील आंबेडकर पुतळा चौकात NSUI च्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पाहताच ताफ्यामागे येणाऱ्या भाजपा समर्थकांनी त्यांच्याशी जोरदार वादावादी केली.

२०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाला सर्व आघाड्यांवर बळकट करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री कामरेड्डी येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. जहीराबादचा दौरा संपवून सीतारामन बनसवाड्याकडे जात असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress supporters attempted to block the route of convoy of union finance minister nirmala sitharaman in kamareddy msr